Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई कुठे काय करते’ मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेत मिलिंद गवळीला कोणी कास्ट केलं ?

अभिनेता मिलिंद गवळीने मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेचं कथानक कसं सुचलं ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना दिली आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 30, 2024 | 03:29 PM
Aai Kuthe Kay Karte Star Cast

Aai Kuthe Kay Karte Star Cast

Follow Us
Close
Follow Us:

‘आई कुठे काय करते’ मालिकेचा आज शेवटचा दिवस आहे. अभिनेता मिलिंद गवळीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत मालिकेबद्दलच्या अनेक आठवणी शेअर केलेल्या आहेत. शिवाय मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेचं कथानक कसं सुचलं ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेता मिलिंद गवळीने पोस्टमधून दिली आहेत.

पोस्ट शेअर करत अभिनेता मिलिंद गवळीने लिहिलंय की,

“Memories/आठवणी मागे राहतात, गेल्या पाच वर्षाच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत, हे आमचं कला क्षेत्र किती मजेशीर आहे, एका माणसाच्या डोक्यात,एक विचार येतो, एक कल्पना सुचते, मग तो एका लेखकाला ती कल्पना लिहून काढायला सांगतो. “आई कुठे काय करते” या मालिकेची कल्पना, बंगाली लेखिकेच्या लीना गंगोपाध्याय यांच्या डोक्यात आली त्यावरून “श्रीमोई” बंगाली मालिका तयार झाली, मग स्टार प्रवाह आणि राजनशाही यांनी तशीच मालिका मराठी प्रेक्षकांसाठी करावी असा विचार केला. “आई कुठे काय करते” हे शीर्षक स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीश राजवाडे यांनी सुचवलं, राजनजींनी नमिता वर्तक हिच्याकडे ही मालिका करायची जबाबदारी दिली, गोष्ट तयार झाली त्यातले पात्र तयार झाले आणि मग महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं कास्टिंग, आणि अनिरुद्ध देशमुख नावाच्या मुख्य पात्र साठी नमिताने मला विचारलं, कमीत कमी चार-पाच कलाकारांची नावे त्यांनी काढली असतीलच, पण त्यात नमिताने माझी निवड केली, राजनजींची त्यांच्या ऑफिसमध्ये भेट झाली, तेव्हा राजनजींच्या मनात मी अनिरुद्ध साकारू शकेन की नाही याबद्दल थोडी शंका मला जाणवली, पण नमितावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या कास्टिंगला होकार दिला. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांची शंका अगदी बरोबर होती कारण “श्रीमोई” मधला अनिरुद्ध फारच भारदस्त authoritative personality होता. पण त्या बिचाऱ्या मराठीतल्या अनिरुद्धच्या नशिबात मी होतो. त्याला तो तरी काय करणार, पण १४९१ भाग पूर्ण होऊन आज ही मालिका निरोप घेत आहे, ही अनिरुद्धची भूमिका मी साकारू शकलो की नाही मला माहिती नाही, पण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की केला, अजून खूप काही करता आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, आज “आई कुठे काय करते” या मालिकेचा प्रवास संपला, migratory birds सारखे सगळे उडून गेले, पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही, “लगान” ची टीम पुन्हा तयार होत नसते, आता फक्त मागे आठवणी ठेवून, सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले, “आई कुठे काय करते” या मालिकेने सगळ्यांनाच भरभरून दिल, माझ्यासाठी राजन शाही, नमिता वर्तक, डी के पी परिवार, सतीश राजवाडे आणि स्टार प्रवाह परिवार यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सातत्याने सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं, आधार दिला, इतक्या लांबचा प्रवास गाठण्यासाठी ताकद दिली, त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या अफलातून सहकलाकारांचा आणि संपूर्ण “आई कुठे काय करते” च्या टीमचा खूप खूप आभारी आहे.”

Web Title: How did come up with the name of the series aai khe kay karte who cast milind gawli in the serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
3

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
4

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.