Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”मी दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होतो…”, अंडरवर्ल्ड पाहिलेले नाट्य निर्माते अशोक शिगवण यांचे वक्तव्य चर्चेत

अशोक शिगवण हे नाव मनोरंजन विश्वातलं मोठं नाव असून त्यांनी अलिकडेच एक वक्तव्य केले आहे जे सध्या चर्चत आहे. त्यांनी गुन्हेगारीची जगताची काळी बाजू पाहिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 14, 2026 | 10:48 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

नाट्य निर्माते अशोक शिगवण यांनी अलिकडेच एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड भाष्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चात आहे. मुंबई आणि गॅंगस्टर यांचं नात फार जुनं आहे. गुन्हेगारी विश्वात जाऊन आलेल्या अशोक शिगवण यांनी त्या काळात काय काय घडलं होते याबद्दल सांगितले आहे. अशोक शिगवण यांच्यावर 12 गुन्हे दाखल होते जे आता नाहीत. एक काळ असा होता की त्यांनी दाऊदच्या बिहिणीचा बॉडी गार्ड म्हणून काम केलं आहे. आता अशोक शिगवण हे नाव मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आहे. त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली आहे.

अशोक शिगवण यांनी काय काय सांगितलं?
अलिकडेच अशोक शिगवण यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखतीत दिली यावेळी ते म्हणाले, ”मुंबई कुणाची?
मला खऱ्या अर्थाने वाटतं की मुंबई ही गिरणी कामगारांची. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत गिरणी कामगार होते. माझे वडील गिरणी कामगार होते. मी सातवी किंवा आठवीत असेन तेव्हा संप झाला. माझे वडील न्यू ग्रेट मिल नाव्याच्या मिलमध्ये काम करायचे. मिल कामगारांना मिलमधून रेशन मिळायचे. आमचे रेशनही मिलमध्ये असायचे. मात्र संपानंतर घराचं संपूर्ण चित्र बदलून गेलं. कमवणारे माझे एकटे वडील, आई अशिक्षित आम्ही तीन भावंडं. संप झाल्याने सगळं उत्पन्न बंद झालं. गावीही आमचं काहीच नव्हत. आम्ही कमवण्याइतके मोठे नव्हतो. संप झाल्यानंतर माझे वडील चोरून मिलमध्ये काम करत असत. त्या काळात अनेक कामगारांच्या हत्या झाल्या कारण असे लपून कामगार काम करत असत. त्यांना कामगारांनीच मारलं. संपात सहभागी व्हावं असं त्यांना वाटत होते. बाकीच्यांच्या दृष्टीने ते चुकीचं असेल, पण बाबांनी आमचं कुटुंब चालवण्यासाठी तो निर्णय घेतला. ”

ते पुढे म्हणाले, ”मी कॉलेजला असताना माझा एक मित्र होता, हेंमत नावाचा. मी त्याच्या बरोबर घरी जायला लागलो. त्याच्या घरी गेलं की घरातल्या गोष्टी पाहून मी भारावून गेलो. त्याचा भाऊ महेंद्र हा खूप मोठा गॅंगस्टर होता. तिथे येणार गॅंगस्टर, सोन्याची घड्याळं पाहून मी प्रभावित झालो. माझ्या मित्राला याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. पण त्याचा भाऊ गॅंगस्टर होता. तिथे सावत्या पासून अनिल असे सगळे गॅंगस्टर याचे. मला हे सगळं खूप आकर्षक वाटायला लागलं होते. मला वाटलं की हे आयुष्य खुप चांगलं आहे. हळूहळू ओळख वाढली, एक दिवस महेंद्र पाटीलला टाडाच्या अंतर्गत अटक झाली. तो नाशिकच्या जेलमध्ये होता. मुंबईहून रोज त्याचा डबा नाशिकला जायचा. 10 ते 12 लोक जेवतील एवढा मोठा डबा रोड त्याच्या साठी जायचा. हा डबा रोज मी घेऊन जात असे.” असं अशोक शिगवण यांनी सांगितले.

Phula Movie: ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा, चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न
दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम
अशोक शिगवण म्हणाले, ”महेंद्र भाई सुटून आला, दाऊदची छोटी बहीण होती मुमताज म्हणून. तेव्हा गॅंग वगैरे नव्हतं. सगळे एकच होते. त्यावेळी मला सांगण्यात आलं होते मुमताज बरोबर तिचा बॉडी गार्ड म्हणून राहायचं. दिवसाला तेव्हा 500 रूपये मिळायचे. माझ्यासोबत आणखी दोन जण होते. मुमताज शॉपिंगला वगैरे जायची किंवा कुठेही गेली की ती आम्हाला सोबत घेऊन जायची. तीन महिने मी दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होतो. मी दाऊदला वगैरे कधी भेटलो नाही. मुमताजही बाहेर असायची. गुन्हेगारी जगात तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. तिथे एक मशिद होती. त्याजवळच आम्ही असायचो. एक संपूर्ण मजला दाऊदचा होता. मी खूप वेळा वरती जायचो. त्या घराच चहा प्यायलो आहे. पण दाऊदची कधी भेट झाली नाही. मला आई वडिलांना पैसे द्यायचे आहेत हे माझ्या डाक्यात असायचे. मी गॅंगस्टर्स बरोबर आहे हे मला माहित होतं, पण पुढच्या गोष्टी तेव्हा घडल्या नव्हत्या. ती दाऊदची बहिण आहे हे पण मला नंतर कळलं होते. ”अस अशोक शिगवण यांनी सांगितले.

Anil Kapoor यांना ‘Dhurandhar 2’साठी मिळाली होती ऑफर, पण ‘या’ कारणामुळे दिला नकार, म्हणाले, ”मी खूप प्रोफेशनल…”

Web Title: I used to be dawoods sisters bodyguard revealed theatre producer ashok shigwan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • dawood ibrahim
  • Entertainmenmt

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.