रणवीरसह इंडियाज गॉट लॅटेंटच्या आयोजकांसह अनेक सेलिब्रिटींना समन्स, नेमकं प्रकरण काय ?
रणवीर अलाहबादियाच्या एका अश्लील कमेंट्सने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. रणवीरमुळे प्रसिद्ध कॉमेडीयन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लॅटेंट’शो कमालीचा वादात सापडला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून इंडियाज गॉट लॅटेंट शोचे निर्माते बलराज घईसह इतर अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आला आहे. निर्मात्यांसह शोमध्ये आलेल्या गेस्टविरोधात पोलिसांनी आता एफआयर दाखल केली आहे. शोच्या पहिल्या भागापासून ते ६ व्या भागापर्यंतचे सर्व होस्ट आणि गेस्टविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
समन्स पाठवण्यात आलेल्या सेलिब्रिटींची आज चौकशी करण्यात येणार आहे. समन्स पाठवण्यात आलेल्या सेलिब्रिटींचा जबाब आज महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अभिनेत्री उर्फी जावेद, राखी सावंत, सिद्धांत चतुर्वेदी, दीपक कलाल, दिलीन नायर उर्फ रफ्तार आणि तन्मय भट्टलाही समन्स पाठवण्यात आला आहे. आज यांची चौकशी केली जाण्याची आहे. सध्या पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केले असून प्रसिद्ध सेलिब्रिटींना समन्स पाठवला आहे.
मल्टीस्टारर “देवमाणूस” चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज, चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी
सध्या समर रैना अमेरिकेत आहे. तो तिथे १७ मार्चपर्यंत राहणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांच्या टीमने सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. समय रैनाच्या वकिलांची टीम सध्या सायबर सेलमध्ये बसून शोसंबंधित पुरावे सादर करीत आहे. दरम्यान, अभिनेता परदेशात आपल्या शोनिमित्त गेला आहे. त्याचा सध्या तिथे असून त्याच्या शोची बुकिंग प्रेक्षकांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शो संपल्यानंतरच तो आता भारतात परतणार आहे. इंडियाज गॉट लॅटेंट शोवर कारवाई करण्यामध्ये एकूण तीन एजन्सी सध्या काम करत आहे. महाराष्ट्र सायबर सेल, आसाम पोलिस आणि खार पोलिस हे तीन एजन्सी काम करत आहे.
रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला मिळणार ५ लाख रुपये, हे बक्षीस जाहीर करणारा इन्फ्लुएन्सर कोण ?
दरम्यान, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मकिझा या दोघांचा जबाब पोलिसांनी आज आणि काल अशा दोन दिवसांत नोंदवून घेतला आहे. यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, प्रसिद्ध युट्यूबर्स आणि शोमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे पोलिस आता चौकशी करणार आहेत. एकूण 30 ते 40 जणांवरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या ते सहाव्या एपिसोडपर्यंत शोमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. दरम्यान प्रत्येकाला त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे.