फोटो सौजन्य: रणवीर अलाहबादिया इन्स्टाग्राम
प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’शोमध्ये आईवडिलांच्या संभोगावरून त्याने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला होता. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गदारोळ सुरु आहे. राजकीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी रणवीरवर कारवाईची मागणी केली आहे. या वादादरम्यान रणवीरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मल्टीस्टारर “देवमाणूस” चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज, चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट मधला एक एपिसोड व्हायरल होत आहे. त्यामध्ये रणवीरची आई उपस्थित होती. तेव्हा तिने त्याला काय शिकवले, तो कसा आहे, तसेच रणवीरच्या बालपणीच्या गमती जमती तयार केल्या.
त्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या आईला प्रश्न विचारला की, “तुला काय वाटतं तू मला एक पालक म्हणून दिलेली सर्वात चांगली गोष्ट कोणती ?” लेकाच्या प्रश्नावर आई उत्तर देत म्हणाली की, “तू व्यवस्थित अभ्यास करतोय की नाही? तुला अभ्यासातल्या बेसिक गोष्टी बरोबर येताय की नाही या गोष्टींकडे मी लक्ष ठेवायचे. तुला मी अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. शिवाय चांगले तत्वेही मी तुला शिकवले आहे. जसं की, कठोर परिश्रम केल्यावरच चांगले फळ मिळते. मला आठवतं मी फक्त भुवया जरी उंचावल्या तरी तुझ्या बहिणीला नीट समजायचं की मला तुला काय सांगायचं आहे. पण तुझ्या बाबतीत मला सारखं ओरडावं लागायचं, जेणेकरून तू अजून चांगलं काहीतरी करशील…”
‘India’s Got Latent’ बाबत वरुण धवनने आधीच केली होती भविष्यवाणी; ‘हा शो नक्कीच क्रॉसफायर…’
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या आईने आणखी अनेक खुलासे केले आहेत. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून रणवीर पुन्हा ट्रोल होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील कमेंट वरून सध्या सर्वत्र गदारोळ माजलेला पाहायला मिळतोय. बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी त्याच्यासोबतचं शूटही कॅन्सल केलं आहे. शिवाय त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्स सुद्धा कमी झाले. याशिवाय रणवीर अलाहबादिया, समय रैना यांच्यासोबत आणखी अनेक सेलिब्रिटींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे.