मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने रणवीर- अपूर्वाला चौकशीसाठी बोलावले होते. आता त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. शोमधील सर्वच युट्यूबर्सने चौकशीसाठी हजेरी लावली होती.
रणवीर अलाहबादियासोबत प्रसिद्ध कॉमेडीयन आशिष चंचलानीला महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. हजर राहिल्यानंतर त्या दोघांचेही आज जबाब नोंदवण्यात आले.
मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने रणवीर अलाहाबादियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ‘इंडियाज गॉट लेटेंट’शो आणि रणवीरने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मत मांडलं आहे.
युट्यूबर ध्रुव राठी यांनी रणवीर अलाहाबादिया प्रकरणात आता एंट्री केली आहे. त्यांनी अपशब्द वापरणाऱ्या विनोदी कलाकारांना ताकीद दिली आहे, तर चांगले काम करणाऱ्या विनोदी कलाकारांचेही कौतुक केले आहे.
रणवीरविरोधात देशातल्या अनेक ठिकाणी FIR दाखल करण्यात आली. त्यासाठी त्याला अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रणवीरला चांगलंच सुनावलं.
युट्यूबर समय रैना सध्या देशाबाहेर आहे. त्याने महाराष्ट्र सायबर सेलला व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे म्हणणे नोंदवण्याची विनंती केली होती. पण, सायबर सेलने याचा नकार दिला आहे. त्याचा जबाब व्हिडिओ कॉलद्वारे नोंदवला…
india’s got latent: रणवीर अलाहबादियाविरुद्ध देशातील अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दाखल झालेल्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी रणवीरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात आज, गुरुवारी, महाराष्ट्र सायबर सेलने विनोदी कलाकार रामय रैना यांना दुसरी नोटीस पाठवली आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' वादाच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर अशी अटकळ आहे की भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला अनफॉलो केले आहे. वापरकर्त्यांनी याचे अनेक पुरावे देखील शेअर केले आहेत.
'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्व माखीजा यांचे जबाब नोंदवले आहे. खार पोलिस स्टेशनला तिने हजेरी लावली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून इंडियाज गॉट लॅटेंट शोचे निर्माते बलराज घईसह इतर अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आला आहे. निर्मात्यांसह शोमध्ये आलेल्या गेस्टविरोधात पोलिसांनी आता एफआयर दाखल केली आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या विधानावरून आता वाद वाढत आहे. आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजानने रणवीरची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. या बातमीने आता खळबळ उडाली आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट मधला एक एपिसोड व्हायरल होत आहे. त्यामध्ये रणवीरची आई उपस्थित होती. तेव्हा तिने त्याला काय शिकवले, तो कसा आहे, तसेच रणवीरच्या बालपणीच्या गमती जमती तयार केल्या.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वाद सुरू असताना वरुण धवनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता समयच्या शोबद्दल सांगत आहे.
२०१५ मध्ये, आमिर खानने इतरांना हसवण्यासाठी अपमानास्पद टिप्पण्या करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले होते. आमिरचे हे विधान आजही, १० वर्षांनंतरही, 'इंडियाज गॉट लेटेंट' वादामुळे चर्चेत आले आहे.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवर रणवीर इलाहाबादिया यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीवर निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विनोदाच्या या आक्षेपार्ह ट्रेंडवर टीका केली.
लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांचे अलीकडील वादग्रस्त विधान एका इंग्रजी शोमधून घेतले गेले असल्याचे समोर आले आहे, ज्यावरून आता सोशल मीडियावर बराच गोंधळ उडत आहे.
कॉमेडियन समय रैनाने त्याच्या 'इंडिया गॉट लेटेंट' शोमध्ये अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर गायक बी प्राकने युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
समय रैनाच्या 'इंडिया गॉट लेटेंट' या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पण्या करणाऱ्या रणवीर इलाहाबादियावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस पथकआता त्याच्या घरी पोहचले आहेत.