'कभी खुशी कभी गम'मधील छोटी करीना होणार लवकरच आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील छोट्या करीनाची भूमिका साकारणारी आणि ‘माता की चौकी’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेल्या अभिनेत्री मालविका राज हिने बॉयफ्रेंड प्रणव बग्गसोबत डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या काही वर्षांनंतर आता अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. मालविका राज लवकरच आई होणार आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवऱ्यासोबतचे काही फोटोज् शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
अबब! करण जोहरची संपत्ती पाहून डोळेच गरगरतील; ‘असा’ आहे राजेशाही थाट
मालविकाने पती प्रणव बग्गसोबत काही फोटोज् शेअर केले आहे. ते फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पतीच्या खांद्यावर उभी आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, “एक नवीन अध्याय सुरू होत आहे… लवकरच आम्ही तीन होणार आहोत!” मालविका आणि प्रणवने व्हाईट कलरचा शर्ट आणि जीन्स वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे. तर अभिनेत्रीने Mom लिहिलेली टोपी कॅरी केलं आहे. तर प्रणवने Dad लिहिलेली टोपी कॅरी केलं आहे.
ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
प्रणवने गर्लफ्रेंड मालविका हिला २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला तुर्कीमध्ये प्रपोज केला होता. मालविका राजने ऑगस्ट २०२३ मध्ये ईटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रणवने तिला कसे प्रपोज केले होते ते सांगितले होते. २३ नोव्हेंबरला मालविका राजने मुंबईत प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला होता. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होतो. या कपलच्या साखरपुड्याला बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यानंतर ३० नोव्हेंबरला हे कपल विवाहबंधनात अडकले. मालविकाचा नवरा प्रणव बग्ग ३० वर्षांचा असून तो बिझनेसमन आहे.