'कहानी' फेम परमब्र चट्टोपाध्याय झाला बाबा, पत्नीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत दिली 'गुड न्यूज'
बंगाली फिल्म इंडस्ट्रीतून एक गोड बातमी समोर येत आहे. बंगाली अभिनेता परमब्रत चट्टोपाध्याय (Parambrata Chattopadhyay) आणि त्याची पत्नी पिया चक्रवर्ती (Piya Chakraborty) हे प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल आई- बाबा झाले आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. परमब्रताच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून परमब्रता आणि पियाचे कुटुंबीय आनंदित झाले आहेत.
अजय देवगणचा ‘रेड २’ इलियाना डिक्रुझने का नाकारला ? सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले कारण
काही तासांपूर्वीच परमब्रता चट्टोपाध्यायने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये परमब्रताचा हात, पियाचा हात आणि नवज्यात बाळाचा पाय पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोवर परमब्रता चट्टोपाध्याय म्हणतो की, “आम्हाला मुलगा झाला आहे! आमचं मन आनंदाने भरुन गेलं आहे. ज्युनियर, तुझं या जगामध्ये स्वागत आहे! आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत करत असताना, त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा आणि प्रार्थना दिल्यात त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो!” असं म्हणत परमब्रता आणि पियाने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
छोट्या मुन्नीची मोठी स्वप्नं, हर्षाली मल्होत्राच्या ‘त्या’ ७ गोष्टी ज्या तिला बनवतात खास
अनेक बंगाली सेलिब्रिटींनी परमब्रता आणि पियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसरसह अनेक चाहत्यांनीही या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परमब्रत चट्टोपाध्याय याला बंगाली आणि हिंदी चित्रपटांतून विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. अलिकडेच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘खाकी: द बंगाल चॅप्टर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोमध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी, जीत, सास्वता चॅटर्जी आणि चित्रांगदा सिंग सुद्धा प्रमुख भूमिकेत होते. परमब्रताची छोटी पण प्रभावी भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘खाकी: द बंगाल चॅप्टर’ २० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.