फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या सोशल आयुष्यात फार व्यस्त असते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात तिने नृत्य सादरीकरण केले होते. विविध मराठी कलावंतांना या कार्यक्रमात त्यांच्या उत्स्क्रुष्ट अभिनयामुळे पुरस्कारित करण्यात आले. अशामध्ये सोनालीने सादर केलेले नृत्य हे विशेष काजोलसाठी होते.
कारण तिने काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर नृत्य सादर केले होते. जे पाहून स्वतः काजोल फार खुश दिसत होती. सोनालीचे नृत्य सादर होताच काजोलने तिला प्रत्यक्ष भेटून तिला दाद दिली. तिची गळाभेट केली आणि ते पाहून सोनालीही भावुक झाल्याचे चित्र समोर आले.
सोनालीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने काजोलचा प्रतिसाद तिच्यासाठी किती मौल्यवान आहे? याचे एकप्रकारे उत्तरच दिले आहे. तिने काजोलने तिला दिलेला प्रतिसादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिच्या भावना लिहल्या आहेत.
“काजोलची मी अगदी लहानपणापासूनच मोठी चाहती आहे… “मेरे ख्वाबों में जो आए” सारख्या तिच्या सगळ्या गाण्यांवर आरश्यासमोर थिरकत राहिलीये, परवा #महाराष्ट्रशासन #राज्यपुरस्कार सोहळ्यात तिच्या समोर, तिच्यासाठी सादरीकरण करण्याची संधी मिळाली, ही इतकी कमाल गोष्ट आहे माझ्यासाठी जी खरं तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही…. तिच्या निखळ अभिनयाने, स्वच्छंदी स्वभावाने आणि on screen आणि off screen असलेल्या जिवंतपणाने, बिनधास्तपणे जगण्याच्या वृत्तीने, निरागस आणि childlike sparkle ने कायमच मला भुरळ घातली आहे. त्यात सादरीकरणानंतर मिळालेल्या तिच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल काय म्हणावे! एका सच्च्या कलाकाराने एका कलाकाराचे असे कौतुक करावे, हे एका उत्तम माणसाचे आणि रसिक असण्याचे चिन्ह. ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील. या आधी #Sridevi आणि #LataMangeshkar यांना मानवंदना वाचण्याची संधी मिळाली होती पण त्या नसताना… पण या वेळी #Kajol च्या वाढदिवशी तिच्या गाण्यांवर, तिच्या समोर live नाचता येणे, ही एका प्रामाणिक fan कडून या तिच्या superstar ला छोटीशी भेट आहे.” असा मसुदा लिहीत तिने तिच्या भावना चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.