(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
निर्मात्यांनी सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा एका भयंकर अवतारात दिसत आहे, ज्यामध्ये तिची दमदार शैली दिसून येते. तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
सोनाक्षीने एका दमदार शैलीत वेधले लक्ष
सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘जटाधारा’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये ती एका दमदार आणि भयंकर अवतारात दिसत आहे. अभिनेत्री कपाळावर लाल तिलक लावलेली दिसत असून, जड दागिने आणि हातात तलवार धरलेली दिसत आहे. ती रागाच्या भरात तिच्या शत्रूंवर हल्ला करतानाही दिसत आहे. अभिनेत्रीच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
सुधीर बाबू शिवभक्ताच्या भूमिकेत दिसला
याशिवाय, चित्रपटात अभिनेता सुधीर बाबूचा लूक दमदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे. टीझरमध्ये अभिनेता शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहे. सुधीर बाबू गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळक लावलेला दिसत आहे. यासोबतच तो सोनाक्षी सिन्हाशी त्रिशूळ घेऊन लढताना दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आडवली आहे.
‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘जटाधारा’ हा चित्रपट एक पौराणिक थ्रिलर चित्रपट आहे, जो भारतीय पौराणिक कथांना रोमांचक दृश्ये आणि गडद कल्पनारम्यतेसह एकत्र करतो. चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमध्ये त्रिशूळ, गडगडणारे ढग, भगवान शिवाचे भक्त आणि सोनाक्षी सिन्हाचे भयंकर रूप दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे कथा अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनते. झी स्टुडिओज आणि प्रेरणा अरोरा निर्मित, वेंकट कल्याण आणि अभिषेक जयस्वाल दिग्दर्शित, या चित्रपटात उत्तम व्हीएफएक्स पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही जाहीर झालेली नाही आहे.