न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मागील 12 तासंपासून भारतीयवंशाचे ब्रिटीश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी व्हेटिलेटवर आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा बॅालिवूड कडून निषेध करण्यात येत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री कंगना राणौत आणि गीतकार जावेद अख्तर यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणटंल आहे.
स्पष्ट विधानांसाठी ओळखली जाणारी स्वरा भास्कर म्हणाली की, लेखक सलमान रश्दी यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध. “सलमान रश्दीसाठी माझ्या प्रार्थना. लज्जास्पद, निंदनीय आणि भ्याड हल्ला
Thoughts and prayers for #SalmanRushdie
Shameful, condemnable and dastardly this attack! #SalmanRushdieStabbed— Swara Bhasker (@ReallySwara) August 12, 2022
तर, अभिनेत्री कंगना रनौतने रश्दींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हण्टलं, “आणखी एक दिवस, जिहादींचं आणखी एक भयानक कृत्य. ‘द सॅटनिक व्हर्सेस’ हे त्यांच्या काळातील सर्वात महान पुस्तकांपैकी एक होतं. माझ्याकडे शब्द नाहीत, मी हादरलेय.. भयंकर!”, असं तिने म्हटलंय. कंगनाने एका बातमीचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये रश्दी यांना हल्ल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय.
[read_also content=”लेखक सलमान रश्दींची प्रकृती नाजूक, हल्लेखोराने केले होते चाकूचे 10 ते 15 वार https://www.navarashtra.com/world/writer-salman-rushdies-condition-is-critical-the-attacker-had-stabbed-him-10-to-15-times-nrps-315561/”]
कंगनाशिवाय गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्धा सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी ट्विट केलं की, “काही कट्टरपंथियांनी सलमान रश्दी यांच्यावर केलेल्या अमानुष हल्ल्याचा मी निषेध करतो. मला आशा आहे की न्यूयॉर्क पोलीस आणि न्यायालय हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करतील.”
I condemn the barbaric attack on Salman Rushdie by some fanatic . I hope that NY police and the court will take the strongest action possible against the attacker .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 12, 2022
[read_also content=”फेक न्यूज कडे लक्ष देऊ नका, राजू श्रीवास्तव यांच्या बद्दल कुटुंबियांची ‘ही’ महत्त्वाची माहिती https://www.navarashtra.com/entertainment/raju-srivastavas-condition-improved-after-fingers-movement-of-shoulder-too-but-no-response-from-brain-nrps-315502/”]