दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. आता कन्नड अभिनेता नागभूषण (kannada actor nagabhushana) याचं नाव चर्चेत आलं आहे. नागभूषण याने शनिवारी बेंगळुरूमध्ये एका जोडप्याला कारने धडक (car hit couple ) दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या पतीची रुग्णलयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी बेंगळुरूमधील कुमारस्वामी ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस रखडल्या, अनेक रेल्वेगाड्या उशीरानं धावल्या, इकडे दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा एकच गोंधळ! https://www.navarashtra.com/thane/angry-passengers-blocked-the-train-at-diva-railway-station-due-to-inconvenience-amid-kokan-railway-train-issue-nrps-464107.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बेंगळुरूमधील वसंत पुरी मेन रोडवर झाला. अभिनेता नागभूषण हे उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे जात होते. यावेळी रस्त्यावरून गाडी चालवत असताना फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला त्याच्या कारने धडक दिली. आधी नागभूषण यांच्या कारने दाम्पत्याला धडक दिली आणि नंतर नियंत्रण सुटून विजेच्या खांबाला धडकली.
एका अहवालानुसार, 48 वर्षीय प्रेमा यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर 58 वर्षीय कृष्णा यांच्या डोक्याला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता नागभूषण स्वत: या जोडप्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, दोघांपैकी महिलेला वाचवता आले नाही.
नागभूषण कन्नड अभिनेता आहेत. तो अनेक कन्नड चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले आहेत. त्याने ‘युवरत्न’, ‘लकी मॅन’ आणि ‘डेअरडेव्हिल मुस्तफा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले