(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
होम्बले फिल्म्स आणि ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ या चित्रपटाने त्याच्या थिएट्रिकल रिलीजपासूनच एक जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडत आहे आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये आकर्षित होत आहेत, जिथे ते खऱ्या अर्थाने सिनेमा अनुभवत आहेत. अप्रतिम व्हिज्युअल्स, दमदार अभिनय आणि खोलवर जाऊन भिडणारी कथा यामुळे ‘कांतारा: चॅप्टर 1’ ला समीक्षक, चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक मिळत आहे. या सिनेमाचं यश फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्येही त्याने आपली छाप पाडली आहे आणि ग्लोबल मार्केटमध्ये मोठा प्रभाव पाडला आहे.
या अफाट यशाच्या पार्श्वभूमीवर, होम्बले फिल्म्सने आता घोषणा केली आहे की ‘कांतारा: चॅप्टर 1’ चा इंग्रजी डब्ड व्हर्जन 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण ही भारताची पहिली अशी फिल्म ठरणार आहे जिचा इंग्रजी डब्ड थिएट्रिकल रिलीज संपूर्ण जगभरात होणार आहे. या ग्लोबल पायरीने ‘कांतारा: चॅप्टर 1’ एका खरी सांस्कृतिक घटना म्हणून पुढे येत आहे, जी भारतीय सिनेमा नवीन उंचीवर नेण्यास तयार आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही सर्वात मोठी भारतीय फिल्म ठरणार आहे.
घोषणा करताना त्यांनी लिहिलं, “एक पवित्र कथा जी देश आणि भाषांच्या पलिकडची आहे! 🕉️✨ #KantaraChapter1 चा इंग्रजी व्हर्जन 31 ऑक्टोबरपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचा हा अद्वितीय प्रवास अनुभवायला विसरू नका ❤️🔥”
ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ हा चित्रपट खरोखरच आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या यशस्वी सिनेमांपैकी एक ठरला आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं असो किंवा बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित करणं, या सिनेमाने देशभरात आणि परदेशातही जबरदस्त प्रभाव टाकला आहे. असं अपवादात्मक यश फारच क्वचित वेळा पाहायला मिळतं.
‘कांतारा: चॅप्टर 1’, ज्याचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केलं आहे, हा 2022 च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा प्रिक्वेल आहे, ज्याला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही भरभरून प्रेम दिलं होतं. ‘कांतारा: चॅप्टर 1’ ही चौथ्या शतकात घडणारी कथा आहे आणि ‘कांतारा’च्या पवित्र भूमीची सुरुवात दर्शवते. या भागात पुरातन संघर्ष, दैवी हस्तक्षेप आणि समृद्ध पुराणकथांमध्ये गुंफलेली लोककथा, श्रद्धा आणि आस्थेची कहाणी दाखवण्यात आली आहे, जी भूमीशी जोडलेली आहे.
जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”
या चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा, गुलशन देवैया, रुक्मिणी वसंत, जयराम, पीडी सतीश चंद्र, प्रकाश थुमिनाड आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकार आहेत, जे या महाकाव्याला अत्यंत सुंदररीत्या सादर करतात.
‘कांतारा: चॅप्टर 1’ ची कथा आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांचे असून, विजय किरगंदूर यांनी होम्बळे फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमॅटोग्राफी अरविंद एस. कश्यप यांची आहे आणि संगीत बी. अजयनीश लोकनाथ यांनी दिलं आहे, ज्यांनी मूळ चित्रपटातील जादुई जग निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ‘कांतारा: चॅप्टर 1’ 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे.