बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेली आहे. या सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर (Kareena Kapoor Pregnancy News) असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र नुकतंच करीनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितलं की, “मी गरोदर नाही. हा सगळा पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे आणि सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिलं आहे. करीनाच्या या स्पष्टीकरणानंतर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचं समोर आलं आहे.”
Kareena and Saif spotted in London with friends pic.twitter.com/HBhGOQvKtm
— Kareena Kapoor Khan (@KareenaK_FC) July 15, 2022
करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या फोटोवरून करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत करीनाला गरोदरपणाविषयी प्रश्न विचारला होता. मात्र त्यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. पण आता नुकतंच तिने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.