करिष्मा कपूरच्या एक्स पतीचे आकस्मिक निधन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये ही दुःखद घटना घडली. पोलो खेळत असताना खेळादरम्यान संजय अचानक जमिनीवर पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.
संजय कपूर एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि त्यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती. त्यांचे अचानक निधन त्यांच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि प्रियजनांसाठी मोठा धक्का आहे. पोलो खेळतानाच हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती अनेक इंग्रजी संकेतस्थळावरून देण्यात येत आहे (फोटो सौजन्य – Instagram)
संजय कपूर कोण?
संजय कपूर हे करिश्मा कपूरचे एक्स पती होते. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले. या लग्नातून त्यांना दोन मुले झाली – मुलगी समायरा आणि मुलगा कियान. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात अंतर आले आणि २०१४ मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यात मानसिक आणि भावनिक छळाचा समावेश होता. ही बाब बराच काळ मीडियामध्ये राहिली.
२९ सप्टेंबर २००३ रोजी करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. त्यावेळी अचानक घटस्फोटित व्यक्तीशी करिष्मा लग्न करत असल्याने हे लग्न खूपच गाजले होते. मात्र आईने सांगितलेल्या मुलासह करिश्माने लग्न करूनही स्वतःचे आयुष्य नरक बनवले. तिला पहिल्या दिवसापासूनच त्रास दिला जात होता असे एका मुलाखतीमध्ये करिश्माने सांगितले होते.
Ahmedabad Plane Crash नंतर सलमान खानने रद्द केला मोठा कार्यक्रम, अभिनेत्याने व्यक्त केले दुःख
संजयवर होते गंभीर आरोप
खरंतर, २०१६ मध्ये जेव्हा करिश्मा कपूरने संजयला घटस्फोट दिला तेव्हा घटस्फोटानंतर करिश्माने तिच्या लग्नाशी संबंधित असे अनेक खुलासे केले जे खूप धक्कादायक होते. अभिनेत्रीने संजय कपूर आणि त्याच्या आईने तिचा छळ कसा केला हे सांगितले. इतकेच नाही तर या काळात करिश्माने असेही सांगितले की जेव्हा ते हनिमूनला गेले होते तेव्हा तिच्या पतीने त्याच्या मित्रांसह तिच्यासाठी बोली लावली होती.
जेव्हा करिश्माने याला विरोध केला तेव्हा संजयने तिला मारहाण केली. करिश्माने असेही उघड केले की जेव्हा ती पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा या काळात संजय आणि त्याच्या आईने तिला खूप त्रास दिला आणि मारहाण केली. या सगळ्याला कंटाळून अभिनेत्रीने संजयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ११ वर्षांच्या लग्नानंतर २०१४ मध्ये दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दोन्ही मुलांची कस्टडी मात्र करिश्माकडेच राहिली.
Housefull 5: रोज चित्रपटाच्या नावावर नवा रेकॉर्ड; आता अक्षयने स्वतःच्याच ‘या’ चित्रपटाला टाकले मागे!
संजयची तिसरी पत्नी
यानंतर संजयने अभिनेत्री प्रिया सचदेवसह तिसरे लग्न केले आणि करिश्माच्या आधी त्याने डिझाईनर नंदिता मेहतानीशी लग्नगाठ बांधली होती. संजयचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले होते. संजयच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर लोक दुःख व्यक्त करत आहेत. सध्या करिश्मा कपूरकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. करिश्मा आणि संजय वेगळे झाले होते, परंतु संजय त्यांच्या मुलांना अनेकदा भेटत असे आणि सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल व्हायचे.