(फोटो सौजन्य - Instagram)
अहमदाबाद विमान अपघातानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील आपला कार्यक्रम रद्द केला आहे. आज, १२ जून रोजी सलमानचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मीडियासोबतचा कार्यक्रम होता, परंतु या घटनेची माहिती मिळताच भाईजानने तो कार्यक्रम रद्द केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान म्हणाला की, सध्या आनंद साजरा करणे योग्य नाही कारण ही घटना खूप गंभीर आहे आणि संपूर्ण देश त्यावर दुःखी आहे.
इशान लोखंडेची प्रतिक्रिया
खरं तर, सलमान खान आणि इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा एक कार्यक्रम होणार होता, परंतु अहमदाबाद विमान अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संस्थापक इशान लोखंडे यांनीही यावर एक निवेदन जारी केले आहे. या घटनेवर इशान म्हणतो की आज आम्हाला या दुःखद घटनेबद्दल कळले आहे.
कार्यक्रम केला रद्द
इशान म्हणाला की, ‘या दुःखाच्या वेळी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आणि सलमान खान देशासोबत उभे आहेत. आमच्या सर्व संवेदना आणि प्रार्थना पीडित कुटुंबांसोबत आहेत. आम्ही संयुक्तपणे हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे आणि नंतरची तारीख ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे. आज १२ जून रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते, ज्यामध्ये २४२ प्रवासी प्रवास करत होते.
मदत आणि उपचार सुरु आहे
या घटनेने संपूर्ण देशाला खूप दुःख झाले आहे आणि सर्वजण पीडितांसाठी प्रार्थना करत आहेत. सामान्य लोकांपासून ते चित्रपट कलाकारांपर्यंत सर्वांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्व केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले आहे. या अपघातात किती लोकांचा जीव गेला आहे हे अद्याप कळलेले नाही, परंतु या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.