
फोटो सौजन्य - Social Media
स्विस लक्झरी घड्याळ निर्माता राडो यांनी आपल्या नव्या जागतिक अभियानात बॉलिवूडमधील दोन आघाडीचे तारे कतरिना कैफ आणि हृतिक रोशन यांना एका प्रभावी दृश्यात्मक कथानकात एकत्र आणले आहे. हे अभियान केवळ दोन सेलिब्रिटींची भेट नसून, परस्परविरोधी ऊर्जा, वेगळे जग आणि त्यांना एकत्र बांधणारी एक अदृश्य पण शक्तिशाली कडी यांचे प्रतीकात्मक दर्शन घडवते. कतरिना आणि हृतिक यांच्यासोबत राडोने याआधीही यशस्वी भागीदारी केली आहे. त्या यशानंतर आता राडोने एक नवे, अधिक खोल आणि अर्थपूर्ण नॅरेटिव्ह सादर केले आहे. या अभियानाचा केंद्रबिंदू आहे राडो अँकर जो केवळ एक डिझाइन घटक नसून अचूकता, सातत्य, विश्वासार्हता आणि जोडणीचे प्रतीक मानला जातो.
या अभियानात कतरिना आणि हृतिक यांच्या स्वतंत्र विश्वांचा कलात्मक पद्धतीने शोध घेण्यात आला आहे. कतरिना कैफ एका सौम्य, प्रकाशमान आणि कर्व्ह्जनी नटलेल्या वास्तुशिल्पीय वातावरणात दिसते. पांढऱ्या आणि फिकट तपकिरी रंगांच्या पडद्यांनी वेढलेली ही भुलभुलैयासारखी जागा पावित्र्य, शालीनता आणि हलकेपणाचे प्रतीक ठरते. या सेटिंगमध्ये कतरिनाच्या मनगटावर झळकणारे सेंट्रिक्स डायमंड्स घड्याळ तिच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे आणि अभिजात शैलीचे दर्शन घडवते. तिच्या हालचालींमध्ये सौम्यता, संतुलन आणि आत्मविश्वास दिसून येतो.
याच्या अगदी विरुद्ध, हृतिक रोशन एका रासवट, नैसर्गिक आणि ताकदीने भरलेल्या वातावरणात सादर होतो. काळाच्या ओघात तयार झालेल्या ज्वालामुखीय खडकांच्या रचना त्याच्या आजूबाजूला असून, त्या साहस, गहनता आणि शोधाची भावना प्रतिबिंबित करतात. हृतिकच्या मनगटावर असलेले कॅप्टन कुक हाय-टेक सिरॅमिक क्रोनोग्राफ त्याच्या दमदार व्यक्तिमत्वाशी सुसंगत ठरते. या घड्याळातील ठळक रेषा, मजबुती आणि कार्यक्षमतेतून ऊर्जा आणि धाडस स्पष्टपणे जाणवते.
सुरुवातीला ही दोन जगं स्वतंत्र आणि समांतर वाटतात, जणू कधीच एकत्र येणार नाहीत. मात्र, एक अदृश्य शक्ती राडो अँकर हळूहळू त्यांना एकमेकांकडे खेचून आणते. आज राडोच्या सर्व ऑटोमॅटिक घड्याळांवर असलेला हा अँकर अचूकता आणि सातत्याचा अढळ बिंदू मानला जातो. या अभियानात तो एक मॅग्नेटिक हृदय म्हणून उभा राहतो, जो फरक मिटवतो आणि ऊर्जा एकत्र आणतो.
कतरिना आणि हृतिक यांची ही भेट केवळ भौतिक स्वरूपाची नाही, तर ती कनेक्शन, मूव्हमेंट आणि संतुलनाची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. दोन्ही प्रवास एका सुसंवादी, कालातीत आणि अभिजात जगात एकत्र येतात. या नव्या अभियानातून राडो आपले तत्वज्ञान अधोरेखित करते—प्रत्येक घड्याळ हे केवळ वेळ दाखवणारे साधन नसून, शोध, अनुभव आणि नातेसंबंधांची एक सुरुवात आहे. सौम्य असो वा सशक्त, नाजूक असो वा धाडसी राडोची घड्याळे प्रत्येक प्रवासात साथ देत, व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या त्या अदृश्य कडीचे दर्शन घडवतात.