'छावा' पाहिल्यानंतर कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणते, 'फक्त प्रेमातच नाही तर...', तुम्हीही म्हणाल बायको असावी तर अशी
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. चित्रपटामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून चित्रपटाचं भरभरून कौतूक करण्यात आलंय. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात विकीनं दमदार अभिनय केला आहे. विकीचा महाराजांच्या रुपातील अंदाज पाहून सर्वच भारावले आहेत.
विकीने केवळ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली नाही तर ती भूमिका विकी जगला असल्याचं चित्रपटात पहायला मिळतंय. दरम्यान विकीची पत्नी कतरिना कैफ हिने सुद्धा पोस्ट शेअर करत लाडक्या पतीदेवाचं तोंडभरून कौतूक केलंय.
‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी चित्रपटाचा प्रिमियर पार पडला. यावेळी प्रिमियरला अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. विकी कौशलच्या फॅमिलीनेही प्रीमियरला उपस्थिती लावली होती. विकी कौशलचे आई- वडिल, पत्नी कतरिना कैफ आणि भावानेही त्याच्या उपस्थिती लावली होती. दरम्यान ‘छावा’ चित्रपट पाहून कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने चित्रपटाचं आणि विकीचं भरभरुन कौतुक केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये कतरिना म्हणते की, “छत्रपती संभाजी महाराजांची अतुलनीय रणनीती कौशल्य जपण्यासाठी एक उत्तम चित्रपट आणि स्मारकीय काम केले गेले आहे. लक्ष्मण उतेकर यांनी ही अविश्वसनीय कथा अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितली आहे. संभाजी महाराजांची गाथा अतिशय जिवंतपणाने मांडण्यात आली आहे. चित्रपट पाहून मी थक्क झाले. चित्रपटातले शेवटचे ४० मिनिटं तुम्हाला निःशब्द करणारे आहे.”
‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या कतरिना कैफनेही तिच्या पतीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. कौतुक करताना तिने त्याला ‘गिरगिट’ म्हटले आहे. अभिनेत्रीने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय की, “मी हा सिनेमा पाहिल्यापासून मला आज पुन्हा सिनेमा पाहण्याची इच्छा होत आहे. चित्रपटामुळे माझ्यावर जो प्रभाव पडलाय तो मी शब्दात नाही सांगू शकत नाही. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अभूतपूर्व काम केलं आहे. संपूर्ण टीमचा मला खूप अभिमान आहे. विकी तू तर उत्तम आहेसच पण तु जेव्हा पडद्यावर येतोस तेव्हा जिवंतपणा आणतोस. तुझं काम पाहून खूप छान वाटलं.”
कतरिना कैफ ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान यांच्याबद्दल म्हणाली, “दिनेश विजान, मी काय सांगू? तू खरा दूरदर्शी आहेस. तू ज्यावर विश्वास ठेवतोस त्याचे समर्थन करतोस आणि त्यावर विश्वास ठेवतोस. तू प्रतिभेसाठी एक नवीन मार्ग तयार करतोस. संपूर्ण कलाकार अद्भुत आहे. हा मोठ्या पडद्यासाठीचा चित्रपट आहे. संपूर्ण टीमचा अभिमान आहे.”