Saif Ali Khan Security Might Be Increase After This Knife Attack Also These Celebrity Got X Y Z Security From Government
‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या शोमध्ये येणाऱ्या लोकांचे नशीब क्षणार्धात बदलताना दिसते. येत्या बुधवारी आणि गुरूवारच्या एपिसोडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर लखनऊहून आलेले प्रशांत त्रिपाठी बसणार आहेत. जे पेशाने महसूल विभागात लँड रेकॉर्डर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांच्या वाक्चातुर्य आणि स्थिरबुद्धीमुळे ह्या भागात ते १ कोटी रुपयांचा प्रश्न जिंकणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सारा अली खानचा जबरदस्त डान्स, Video पाहून नेटकरी म्हणाले…
प्रशांत त्रिपाठी यांच्यासोबत गप्पा मारताना बिग बींना ‘दीवार’ आणि ‘कभी कभी’ या त्यांच्या आवडत्या चित्रपटांची आठवण झाली. ते म्हणाले, “मी एकदा ‘दीवार’मधील एक ॲक्शन सीनचं शूटिंग उरकून मला ‘कभी कभी’चित्रपटातील एका रोमॅंटिक सीनच्या शूटिंगसाठी काश्मीरला जायचे होते. ते फार विचित्र वाटायचे, अचानक गियर बदलल्यासारखे! मी निर्माते यश चोप्रा यांना म्हणालो की ‘हे फार विचित्र वाटते. ॲक्शनवरून एकदम रोमान्स!’ त्यावर ते मला म्हणाले, ‘नाही नाही, सर्व काही ठीक होईल.’ म्हणून मी त्यांना सहज विचारले, ‘माझा लूक कसा असेल?’ मला अगदी २ दिवसांत निघायचे होते, त्यामुळे त्यांनी सांगितले, ‘तुझ्या घरी असेल, त्यापैकी काहीही चालेल.’ त्यामुळे चित्रपटात जे काही कपडे तुम्हाला दिसतात, ते माझे स्वतःचेच आहेत.” पुढे बिग बीं मिश्किल अंदाजात म्हणाले की, “आणि अजून ते कपडे मला परत केलेले नाहीत.”
संजीदा शेखने ‘हीरामंडी २’ बाबत केला मोठा खुलासा, संजय लीला भन्साळी मालिकेचा कसा असेल दुसरा भाग?
गुरुवारी, प्रशांत त्रिपाठी यांच्यासमोर एक रोमांचक आव्हान असणार आहे. ते त्या दिवशी १५ व्या प्रश्नावर पोहोचणार आहेत. म्हणजे १ करोडच्या प्रश्नाचा सामना करताना दिसणार आहेत.