माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सारा अली खानचा जबरदस्त डान्स, Video पाहून नेटकरी म्हणाले...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग ही बघायला मिळते. केव्हा फॅशन तर केव्हा व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत राहणाऱ्या साराचा सध्या खासगी आयुष्यातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री सारा अली खानचा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड वीर पहारियाचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सारा आणि वीर हे दोघंही डान्स करताना दिसत आहेत.
‘मी भारतात कॉन्सर्ट करणार नाही’; दिलजीत दोसांझ ‘या’ वक्तव्यामुळे अडचणीत, स्वत:च दिलं स्पष्टीकरण!
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर सारा अली खानचा आणि वीर पहारियाच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोघंही शुटिंग दरम्यान डान्स करताना दिसत आहेत. खरंतर सारा आणि वीर ‘स्काय फोर्स’ नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसून दोघंही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. ते दोघंही एका बौद्ध मंदिरासमोर गढवाली गाण्यावर नाचताना दिसून येत असून त्यांच्यासोबत बॅकग्राऊंड डान्सर्सही दिसत आहेत.
शुटिंगदरम्यान, साराने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडी नेसली असून वीरने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा सूट परिधान केलेला दिसत आहे. ‘स्काय फोर्स’चित्रपटात प्रमुख भूमिकेत, अक्षय कुमार, निम्रत कौर, सारा अली खान आणि वीर पहारिया यांच्यासह काही प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटीही दिसणार आहेत. १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान एअर वॉरच्या कथेची पार्श्वभूमी चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ॲक्शन थ्रिलर ‘स्काय फोर्स’चित्रपट २०२५ मध्येच रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार अशी चर्चा सुरू होती, पण अद्याप चित्रपटाची शुटिंग संपलेली नाही. अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केलेली नाही.
प्राजक्ता माळीची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ कविता ऐकली का ? पाहा Video
सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याचा भाऊ शिखर पहारिया गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय. अनंत- राधिकाच्या लग्नात वीर आणि शिखर हे दोघंही भाऊ कमालीचे प्रकाशझोतात आले होते. ‘कॉफी विथ करण’या चॅट शोमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने जान्हवी आणि सारा वीर आणि शिखर या दोन्हीही भावंडांना डेट करत आहेत, अशी हिंट दिली होती. तेव्हापासूनच वीर आणि शिखर चर्चेत आहेत. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत स्वत: साराने वीर पहाडियाला डेट केल्याची कबुली दिली होती. “मी फक्त वीर पहाडियाला डेट केलंय. माझ्या आयुष्यात दुसरा कोणीच बॉयफ्रेंड नाही”, असं ती म्हणाली होती.