jyotirmayee
‘कौन बनेगा करोडपती’च्या (Kaun Banega Crorepati) १४ व्या पर्वात सहभागी झालेल्या एका महिला स्पर्धकाने बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अनेक स्पर्धकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ज्योतीर्मयी मल्लिक (Jyotirmayee Mallik) असे या महिला स्पर्धकाचे नाव आहे. ही महिला स्पर्धक ओडिशामधील रहिवाशी आहे. त्या पोस्ट ऑफिसमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करत आहेत. हे पत्र त्यांनी अमिताभ यांना वाचून दाखवलं.
पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की, “आदरणीय अमिताभ बच्चन जी, सप्रेम नमस्कार… आम्ही कधी तुमच्यासारखे बनू शकतो की नाही याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण तुम्ही आमच्यापैकीच एक आहात, हे तुम्ही सिद्ध केलं आहात. ज्याप्रकारे तुम्ही आम्हाला आदरपूर्वक हॉटसीटवर बसण्यासाठी मदत करता, आमचे अश्रू पुसता आणि तो टिश्यू स्वत:च्या खिशात ठेवता. तुम्ही प्रेक्षकांमध्ये जाता आणि त्यांच्यातील एक होता. कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो की असा महानायक शतकातून एकदाच होतो, असे पत्र ज्योतीर्मयी यांनी वाचून दाखवलं.” या पत्रातील अमिताभ बच्चन भावूक झाले.