(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती सीझन १७’ च्या प्रतिष्ठित क्विझ शोचे शूटिंग अधिकृतपणे सुरू केले आहे. त्यांनी अलीकडेच शोबद्दल एक अपडेट शेअर केला. यासोबतच निर्मात्यांनी या सीझनबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती सीझन १७’ हा नवा सीझन पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या सीझनचा पहिला स्पर्धक कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे. आता शो कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
या सीझनमध्ये काय खास असेल
पीटीआयच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी सांगितले की या नवीन सीझनमध्ये नवीन स्पर्धक, कठीण प्रश्न आणि शोच्या २५ वर्षांच्या पूर्ततेचा आनंद साजरा करण्यासाठी काही खास आश्चर्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ते म्हणाले, “केबीसी १७ हा नवीन सीझन आणि उत्तम होस्टसह प्रेक्षकांचा आवडता शो बनेल. सुरुवातीच्या एपिसोडमध्ये नवीन घोषणा केल्या जातील.” आता या नवीन सीझनमध्ये नक्की काय खास घडते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शोबद्दल अमिताभ बच्चन यांनी शेअर केली पोस्ट
केबीसी शोला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सोनी टीव्हीने ‘जहाँ अकल है वहान आकड है’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा उत्सव साजरा करते. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी केबीसीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. बिग बी २००० पासून केबीसीचे होस्ट आहेत (२००३ मधील एका सीझन वगळता). त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नवीन सीझनबद्दल उत्साह आणि चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “काम सुरू होते… सकाळी लवकर उठणे, केबीसीच्या नवीन सीझनचा पहिला दिवस… नेहमीप्रमाणे घाबरणे, थरथरणारे गुडघे.” त्यांनी असेही म्हटले की स्पर्धक आणि प्रेक्षक शो खास बनवतात.
केबीसी चा नवा सीझन कधी होणार सुरु
“कौन बनेगा करोडपती” सीझन १७ चा प्रीमियर ११ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. यासोबतच, हा शो सोनीलिव्हवर देखील स्ट्रीम केला जाणार आहे, प्रेक्षकांना नक्कीच या नवीन सीझन मधून कधी खास पाहायला आणि शिकायला मिळणार आहे.