'कौन बनेगा करोडपती'शो ला २५ वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट...
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन अनेक चित्रपट आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये बिग बींनी एक खास नोटही शेअर केलेली आहे.
‘तू धडकन मैं दिल’ मालिकेच्या संगीत मैफिलीत सामील होणार आदित्य नारायण, पाहा विशेष भाग
३ जुलै २००० पासून हा शो टेलिकास्ट होत आहे. तेव्हापासून ते आजवरचा अनुभव अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “आज ३ जुलै २०२५ रोजी जेव्हा मी या वर्षीच्या KBC सीझनची तयारी करीत होतो, तेव्हा मला केबीसी टीमने सांगितलं की, केबीसीचे ३ जुलै २००० रोजी पहिल्यांदा प्रसारण झाले होते… २५ वर्षे, केबीसीचे आयुष्य!”, असं अमिताभ बच्चन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना नमुद केले. दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’हा जागतिक स्तरावरील ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलिनेयर’ या लोकप्रिय शोची हिंदी आवृत्ती आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टवर मुलगी श्वेता बच्चन, अभिनेत्री दिव्या दत्ता, रणवीर सिंग, रोनित रॉय, अहाना कुमरा, निम्रत कौर, ऋचा चढ्ढा आणि सुधांशू पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी बिग बींच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अनेकांनी अमिताभ यांच्या प्रवासाचे आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो २००० पासून ‘स्टार प्लस’या चॅनलवर टेलिकास्ट होत आहे. तेव्हापासून समीर नायर यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रामिंग टीमने हा शो सुरू केला होता. अमिताभ यांनी तिसऱ्या सीझन सोडला तर, जवळजवळ सर्व सीझनसाठी हा शो होस्ट केला आहे. त्यावेळी त्या सीझनचा होस्ट शाहरुख खान होता.
जय भानुशालीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर संतापली माही विज, म्हणाली ‘तुमचं माझ्याशी नातं काय ?’