'खतरो के खिलाडी १५'साठी रोहित शेट्टीची 'या' दोघांना पसंती, एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तर दुसरा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता
रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय शो ‘खतरो के खिलाडी’चा पुढील सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, आता ‘खतरों के खिलाडी १५’ बद्दल नवीन अपडेट्स येऊ लागले आहेत. एल्विश यादव ते मल्लिका शेरावत अशी अनेक नावं सध्या समोर आली आहेत. तसंच यामध्ये टीव्हीवरील एका प्रसिद्ध चेहऱ्याचाही समावेश आहे. कोणाकोणाला ‘खतरो के खिलाडी’साठी विचारणा झाली आहे बघुया.
‘खतरों के खिलाडी १५’ च्या निर्मात्यांनी शोसाठी टीव्हीवरील लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींना शोसाठी विचारणा केली आहे. ‘खतरों के खिलाडी १५’ साठी पहिले नाव एल्विश यादवचे होते. एल्विशनंतर टीव्ही अभिनेता अविनाश मिश्राचेही नाव या यादीत जोडले गेले आहे. ‘खतरो के खिलाडी’मध्ये आजवर अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटी झळकले आहेत. त्यांनी शोमधून बक्कळ कमाईही केली. आता नव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी काही कलाकारांनी अप्रोच केलं आहे. नव्या सीझनसाठी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसीन खानला (Mohsin Khan) विचारणा झाल्याची चर्चा आहे. त्याने अद्याप यावर भाष्य केलेलं नाहीय. त्याला याआधी बिग बॉसचीही ऑफर होती जी त्याने नाकारली होती.
कोरियोग्राफर गणेश आचार्चची अभिनयात एन्ट्री, ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका
मोहसीन खानला यापूर्वी सलमान खानच्या ‘बिग बॉस’चीही ऑफर मिळाली होती. पण त्याने ती सुद्धा नाकारली होती. दरम्यान, इमरान हाश्मीच्या ‘मर्डर’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणाऱ्या मल्लिका शेरावतचे नावही रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित शो ‘खतरों के खिलाडी १५’साठी देखील पुढे आले आहे. या शोमधून मल्लिका शेरावत, एल्विश यादव, अविनाश मिश्रा आणि मोहसिन खान यांच्याव्यतिरिक्त गुल्की जोशी, तजिंदर पाल सिंग बग्गा आणि गोरी नागोरी यांची नावे समोर येत आहेत. अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र प्रेक्षकांना नव्या सीझनची कमालीची उत्सुकता आहे.
‘बिग बॉस १८’ मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री ईशा सिंहचं (Eisha Singh)नाव ‘खतरो के खिलाडी १५’साठी कन्फर्म झाल्याचं समोर येत आहे. ईशालाही शोमध्ये येण्याची उत्सुकता आहे. ईशाने ‘ईश्क का रंग सफेद’, ‘इश्क सुभानल्लाह’, आणि ‘सिर्फ तुम’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.