सध्या सर्वत्र बॉबी देओल चर्चेत आहे याचं कारण म्हणजे वॉर 2. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असली तरी एक मराठमोळा चेहरा हिंदी सिनेमात झळकताना दिसत आहे. या सिनेमात कर्जतमध्ये राहणारी बालकलाकार खुशी हजारे मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.वेड या चित्रपटाच्या माध्यमातून आघाडीची बाल कलाकार म्हणून समोर आलेली खुशी हजारे वॉर 2 मुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
देशभरातील थिएटर मध्ये वॉर 2 हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाबाबत म्हणायचं तर प्रेक्षकांची पसंती असूनही बॉक्सऑफिसवर पाहिजे तशी कमाई होताना दिसत नाही. मात्र सिनेमातील बालकलाकार म्हणून पुढे आलेली खुशी हजारे हिने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते.त्यावेळी अभिनेता रितेश देशमुख याच्या तोडीचा अभिनय खुशीने केला होता आणि त्याबरोबर तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सध्या 12 वर्षाची असलेली खुशी हिला फिल्मफेअर तसेच झी चित्र गौरव,फक्त मराठी, सकाळ प्रीमियर आदी मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यात आता तिचा वॉर 2 मधील अभिनय चित्रपट रसिकांची वहावा मिळवत आहे.इतक्या लहान वयात तब्बल 14 चित्रपटात अभिनय करणारी खुशी वॉर 2 मध्ये तिच्या वेगळ्या अभिनयाने समोर आली आहे.हा चित्रपट संपल्यावर ही पोस्ट क्रेडिट सीन दाखवले जातात.त्यातील एका सीन मध्ये खुशी हिच्या हातावर बॉबी देओल टॅटू काढत असल्याचे पाहून तिचा अभिनय किती उजवा झाला याची चर्चा होत आहे.
तो अल्फा सिम्बॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत असून खुशी व चित्रपटाच्या निमित्ताने अनेक पुरस्कारांना गवसणी घालणार असे चित्रपट समीक्षक बोलत आहेत. वायआरएफ च्या स्पाय युनिव्हर्स चू भाग असलेल्या अल्फा या चित्रपटात देखील खुशी दिसणार आहे. कर्जत शहरातील भिसेगाव भागात राहणारी खुशी चे माता पिता तिला अभिनयासाठी विशेष प्रवृत्त करतात आणि त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.