Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

बॉबी देओल, सान्या मल्होत्रा ​​आणि सपना पब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला "बंदर" चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 02:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “बंदर” चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  • जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
  • बॉबी देओलचा दिसला नवा लूक
 

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आपल्या आगामी ‘बंदर’ उर्फ ‘मंकी इन अ केज’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये पार पडला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची थाप मिळवल्यानंतर आता हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, आज शुक्रवारी चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख जाहीर करण्यात आली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ हा चित्रपट येत्या २२ मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. नवीन पोस्टरसह रिलीज डेट जाहीर करण्यात आली. पोस्टरमध्ये बॉबी देओलचा इंटेन्स आणि खतरनाक लूक पाहायला मिळाला आहे, जो चित्रपटाच्या आशयाची झलक देत आहे. व्यवस्थेच्या कारस्थानात अडकलेल्या एका सामान्य माणसाची संघर्षमय आणि भावनिक कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. अन्याय, सत्तेचा गैरवापर आणि सामाजिक विसंगती यांचा वेध घेणारा हा सिनेमा वास्तववादी पद्धतीने मांडला गेला आहे.

 

या चित्रपटात बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा, सबा आझाद आणि सपना पब्बी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी यांनी केली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर त्याची टोरंटो महोत्सवासाठी निवड झाल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली.

The 50’ च्या विजेत्याचे नाव जाहीर? बिग बॉसच्या ‘या’ एक्स कंटेस्टंटने मारली बाजी

‘बंदर’चे चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनुराग कश्यप यांनी केले आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘अग्ली’ यांसारख्या वास्तववादी आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अनुराग कश्यप आपल्या वेगळ्या कथनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. सामाजिक वास्तवावर भाष्य करताना ते नेहमीच प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात, आणि ‘बंदर’मध्येही त्याच शैलीची झलक पाहायला मिळणार आहे.

आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बॉबी देओलचा गंभीर आणि ताकदीचा अवतार प्रेक्षकांना भावला असून, हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्यानंतर आता भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘बंदर’ काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Sanya malhotra bobby deol nikhil dwivedi and anurag kashyap movie bandar release date announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Bobby Deol
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
1

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
2

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा
3

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव
4

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.