Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्त्री २’ चित्रपटाने बनवले ‘हे’ रेकॉर्ड्स; बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा कहर

१५ ऑगस्ट रोजी सिनेमाघरात प्रदर्शित झालेला 'स्त्री २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. अनेक चित्रपटांना मात देत 'स्त्री २' ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. सिनेमाने अद्याप अनेक रेकॉर्डस् आपल्या नावी करून घेतले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 18, 2024 | 06:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘स्त्री २’ या चित्रपटाने सिनेमाघरात पाऊल ठेवताच कहर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्त्री २ चित्रपटाच्या येण्याच्या बातमीनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमासाठी असणारी लोकांची उत्सुकता काही औरच होती. चित्रपटाने सिनेमाघरात येताच अनेक सिनेमांना धोबी पछाड दिला आहे. ‘स्त्री २’ भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सिनेमाघरात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले होते. याच दिवशी अनेक हिंदी तसेच दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले होते. एकंदरीत, सिनेसृष्टीत स्पर्धेचे वातावरण होते. यादरम्यान, स्त्री २ ला प्रेक्षकांनी इतकी पसंती दिली आहे कि सिनेमाने अनेक सिनेमांना मागे टाकले आहे. इतकेच नव्हे तर स्त्री २ सिनेमाने काही रेकॉर्डस् आपल्या नावे करून घेतले आहे.

‘स्त्री २’ चित्रपट ठरला २०२४ वर्षातील सगळ्यात मोठा ओपनर

स्त्री २ साठी लोकांची उत्सुकता बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये दिसून येत आहे. चित्रपट सुरुवातीच्या दिवसापासूनच रेकॉर्ड बनवणे तसेच रेकॉर्ड तोडण्याचे काम करत आहे. स्त्री २ ने पहिल्याच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून २०२४ मधील सगळ्यात मोठा ओपनर भारतीय चित्रपट म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. याअगोदर फायटर चित्रपट यंदाच्या वर्षीच बेस्ट ओपनर चित्रपट होता. फायटरने पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई केली होती, जी स्त्री २ चित्रपटाने मोडून काढली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील ‘बेस्ट ओपनर’

श्रध्दा कपूर तसेच अभिनेता राजकुमार राव स्टारर सिनेमा ‘स्त्री २’ यंदाच्या वर्षीचा बेस्ट ओपनर चित्रपटाचा मानकरी तर ठरलेच आहे, त्याचबरोबर सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीतील बेस्ट ओपनर फिल्मचा टायटल स्वतःच्या नावी करून घेतले आहे. स्त्री २ चा ओपनिंग डे कलेक्शन ५१.८ कोटी रुपये इतका होता तर प्रिव्हयु शोज मिळून एकूण कलेक्शन ६०.३ कोटी इतकी आहे.

हे सुद्धा वाचा : ‘स्त्री २’ नंतर ‘बॉर्डर २’ मध्ये पाहायला मिळणार ‘हा’ अभिनेता; सनी देओलच्या चित्रपटात ‘या’ ऍक्टरची एन्ट्री

स्वातंत्र्यदिनी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट

गेल्या वर्षी १५ ऑगस्टला सनी देओलचा सिनेमा गदर २ प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली होती. बहुतेक जणांना वाटत होते कि हा आकडा तोडणे अशक्य आहे. परंतु, स्त्री २ ने गदर २ चित्रपटाचा रेकॉर्ड तोडत स्वातंत्र्यदिनी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून स्थान मिळवले आहे.

स्त्री २ चित्रपटाने ‘या’ चित्रपटांना टाकले मागे

‘स्त्री २’ ने ५ नुकतेच गाजलेल्या सिनेमांना धोबी पछाड दिला आहे. या चित्रपटांमध्ये ‘एनिमल’, ‘भूल भुलैया 2’, ‘पठान’, ‘एनिमल’ तसेच ‘वॉरचा समावेश आहे.

Web Title: Know about the records made by stree 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Shraddha Kapoor
  • Stree 2

संबंधित बातम्या

श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’
1

श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’
2

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत
3

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत

‘छावा’नंतर महाराष्ट्रातील ‘या’ तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
4

‘छावा’नंतर महाराष्ट्रातील ‘या’ तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.