
फोटो सौजन्य - Social Media
मुंबईच्या गिरणी कामगारांचा इतिहास आणि लालबाग-परळची संस्कृती हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. याच आधारावर २०१० मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘लालबाग परळ’ झाली मुंबई सोन्याची हा चित्रपट येवून गेला. काहींना चित्रपटला समिश्र प्रतिक्रिया दिल्या काहीनी यावर टीका केली. मात्र या चित्रपटाचे पडसाद अजुनही उमटल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबद्दल आजही लालबाग-परळमधील स्थानिकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड चीड आहे. एका व्हायरल व्हिडिओनुसार एका व्यक्तीने यावर संताप व्यक्त केला आहे तसेच मांजरेकरांना अपशब्द वापरले आहे.
चारित्र्यहनन आणि चुकीचं चित्रण?
व्हिडिओमध्ये वक्तव्य केल्यानुसार, या चित्रपटात लालबाग-परळमधील महिलांच्या चारित्र्याचं ज्या प्रकारे चित्रण करण्यात आलं आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. आमच्या बहिणी, माता आणि स्त्रियांच्या चारित्र्याचं हनन करणारी दृश्ये या सिनेमात दाखवून महेश मांजरेकरांनी स्थानिकांच्या भावना दुखावला आहेत, असा आरोप केला जात आहे.
मराठी माणूस लाचार दाखवला?
चित्रपटातील एका दृश्यात एक अभिनेता रस्त्यावर पडलेला वडापाव उचलून खाताना दाखवला आहे. या दृश्यावर स्थानिकांचा तीव्र आक्षेप आहे. लालबाग-परळचा मराठी माणूस कष्टकरी आहे, पण तो लाचार नाही. गिरण्या बंद झाल्यावर अनेक महिलांनी पोळी-भाजी केंद्र चालवली, पुरुषांनी वडापावच्या गाड्या लावल्या, पण रस्त्यावरचे उचलून खाण्याची वेळ कधीही आली नाही. सिनेमा अधिक मसालेदार करण्यासाठी वास्तवाचा विपर्यास केल्याचा आरोप मांजरेकरांवर आहे.
चित्रपट चालवण्यासाठी आमच्या प्रश्नांचा बाजार केला
लालबाग-परळच्या प्रश्नांवर आधारित नाटकावरून हा चित्रपट बनवला गेला असला, तरी चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी कधी घडल्याच नाहीत, असे व्यक्तीचे म्हणणे आहे. केवळ व्यावसायिक यशासाठी गिरणी कामगारांच्या संघर्षाचा बाजार मांडला गेला आणि आमची प्रतिमा डागाळली गेली, असे मत संतापलेल्या व्यक्तीने केले आहे.
तेव्हाच प्रतिक्रिया का दिली नाही?
सुरुवातीला या चित्रपटाच्या विरोधात हिंसक आंदोलने करण्याचा विचार स्थानिकांनी केला होता. मांजरेकरांना ऑफिसमध्ये जावून मारणार होतो मात्र, “चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केल्यास त्याला त्या चित्रपटाला आधिक प्रसिद्धी मिळेल आणि चित्रपट हिट होईल, या विचाराने अनेकांनी संयम पाळला. मात्र, आजही महेश मांजरेकर यांच्याबद्दल या भागातील लोकांच्या तीव्र राग आहे.