मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या ८ चित्रपटांची केली घोषणा, Bhediya 2 आणि Stree 3 केव्हा येणार ?
२०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री २’ आणि ‘मुंज्या’ने त्यांच्या कहाणीने प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासून प्रेक्षकांना या दोन्हीही चित्रपटांच्या सीक्वेलची आतुरता आहे. नुकतंच निर्मात्यांनी या दोन्हीही चित्रपटांसह इतर सहा चित्रपटांच्याही सिक्वेलची माहिती दिली आहे. येत्या काही वर्षांमध्ये ‘स्त्री 3’, ‘महा मुंज्या’ आणि ‘भेडिया’सह मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी विश्वातील एकूण ८ चित्रपटांची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या यादीमध्ये कोणकोणत्या ८ चित्रपटांचा समावेश आहे, शिवाय हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी प्रदर्शित होणार आहेत.
राम चरणने ‘गेम चेंजर’ची फी केली कमी; दुहेरी भूमिकेसाठी घेतली एवढीच रक्कम? जाणून व्हाल चकित!
२०२५ मध्ये मॅडॉक फिल्म्स युनिव्हर्सच्या यादीमध्ये ‘थामा’, ‘शक्तिशालिनी’ आणि ‘चामुंडा’यांसारख्या नव्या चित्रपटांची भर पडणार आहे. मॅडॉक फिल्म्स २०२५ ते २०२८ या वर्षामध्ये दरवर्षी दोन वेगवेगळे चित्रपट सादर करणार आहेत. या युनिव्हर्सचा दुसरा टप्पा २०२५ च्या दिवाळीमध्ये रिलीज होणाऱ्या ‘थामा’ चित्रपटापासून सुरु होणार आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२५ रोजी ‘शक्तिशालिनी’ प्रदर्शित होईल. यानंतर १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘भेडिया २’ आणि ४ डिसेंबर २०२६ ‘चामुंडा’ चित्रपट रिलीज होणार आहे.
१३ ऑगस्ट २०२७ रोजी मोस्ट अवेटेड ‘स्त्री ३’ आणि २४ डिसेंबर २०२७ रोजी ‘महामुंज्या’ प्रदर्शित होईल. यानंतर या युनिव्हर्सची भव्य कथा ‘महायुद्ध’ या दोन भागांच्या महाकाव्याद्वारे सादर होऊन या युनिव्हर्सच्या चित्रपटांचा शेवट होईल. मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील ‘पेहला महायुद्ध’ ११ ऑगस्ट २०२८ रोजी प्रदर्शित होईल आणि ‘दुसरा महायुद्ध’ दिवाळीत १८ ऑक्टोबर २०२८ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचा पोस्टर मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केले आहे. या चित्रपटासंबंधित असणार्या कलाकारांनीही आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. श्रद्धा कपूरने तिचा सेल्फी आणि चित्रपटाच्या घोषणेचा फोटो पोस्ट करत “ब्रम्हांड असावे तर असे” असं कॅप्शन देत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Game Changer Trailer: ‘गेम चेंजर’च्या ट्रेलरमध्ये राम चरणची लक्षवेधी भूमिका, कियाराने वाढवला ग्लॅमर!