'स्त्री कशासाठी...?', ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरून किन्नर आखाड्यात सुरू झाला राडा
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून कमालीची चर्चेत आहे. ती डिसेंबर २०२४ मध्ये, केनियातून भारतात महाकुंभासाठी आली होती. सध्या भारतात प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रयागराजमधील महाकुंभामध्ये सामील झाली असून तिने तिथेच सन्यासाचीही घोषणा केली आहे. ममताच्या संन्यास सोहळ्याचे फोटो- व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशाप्रकारे एका महिलेला ‘महामंडलेश्वर’ही दीक्षा कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे आता किन्नर आखाड्यातच राडा सुरू झाला आहे.
अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अमिताभ बच्चन पुन्हा दिसणार एकत्र; करणार या आगामी प्रोजेक्टमध्ये काम!
‘तिरंगा’, ‘आशिक आवारा’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘बाजी’सारखे दमदार चित्रपट बॉलिवूडला देणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियातून 25 वर्षांनी भारतात आली. दरम्यान, भारतात ती कुंभमेळ्यासाठी आली असल्याचे तिने सांगितले होते. प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात तिने हजेरी लावल्यानंतर संन्यास घेतला. अभिनेत्रीने संन्यास घेतल्यानंतर ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्यामध्ये ममताला महामंडलेश्वरची दीक्षा दिल्यानंतर आता तिचे नाव श्रीयामाई ममता नंद गिरी झाले आहे. किन्नर आखाड्याचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममताला दीक्षा दिली. पण यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून आक्षेप घेतला जात आहे. ममताला अशाप्रकारे महामंडलेश्वर ही दीक्षा कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी ममता कुलकर्णी यांच्या दीक्षा घेण्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, किन्नर आखाडा तृतीय पंथीयांसाठी आहे, मग एका महिलेला महामंडलेश्वर का केले? अशाप्रकारे जर कोणालाही महामंडलेश्वर बनवायचे असेल तर आखाड्याचे नाव किन्नर का ठेवले गेले? असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता महामंडलेश्वर या उपाधीमुळे संतांमध्ये फूट पडली आहे. एकीकडे संत म्हणतात की अशा माणसाला उचलून संत बनवता येत नाही. त्याचे पात्र पाहिले जाते. किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप केले आहे.
स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा, कोण कोण घेणार सहभाग ?
तर दुसरीकडे, ममता यांच्यावर आरोप आहेत जे अद्याप सिद्ध झालेले नाहीत. प्रत्येकाला निवृत्ती घेण्याचा अधिकार आहे. एका वेश्येलाही गुरू बनवले होते. त्यामुळे क्षमता असलेल्या कोणालाही महामंडलेश्वर बनवता येते, असं संत म्हणाले होते. खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. दरम्यान, तिचा अध्यात्माकडे कल अधिक वाढला. त्यानंतर ममता कुलकर्णी यांनी शुक्रवारी महाकुंभला पोहोचून किन्नर आखाड्यातून संन्यासाची दीक्षा घेतली. याआधी तिने पिंड दानही केले होते.
तिची संन्यास घेण्याची विधी प्रक्रिया संगमच्या काठावरच सुमारे दोन तास चालली. यावेळी अनेक महान ऋषी, संत आणि महामंडलेश्वरही उपस्थित होते. सायंकाळी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पट्टाभिषेकही करण्यात आला. त्यानंतर तिचे नाव बदलून श्रीयामाई ममता नंद गिरी असे ठेवण्यात आले. “अर्धनारेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या हस्ते माझा पट्टाभिषेक झाला यापेक्षा माझ्यासाठी मोठे काय असू शकते. महामंडलेश्वर होण्यासाठी आपण कठोर तपश्चर्या केली आहे. मी गेल्या २३ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता अखेर मी धार्मिक प्रवासाला निघाली आहे. मी आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परत येणार नाही, धर्माच्या मार्गावरच पुढे जाईल.”, असं ममता कुलकर्णी म्हणाली.