(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रस्ते सुरक्षा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीत पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार मिळून लोकांना रस्ता सुरक्षेबद्दल जागरूक करताना दिसणार आहेत, या मोहिमेचा उद्देश लोकांच्या होणाऱ्या अपघातांवर आहे. ही मोहीम केंद्रीय रस्ते सुरक्षा आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश रस्ते अपघात कमी करणे असा असणार आहे. आधीक माहिती जाणून घेऊयात या मोहिमेबद्दल.
महाराष्ट्र सरकार शाहरूख खानला देणार 9 कोटी? ‘मन्नत’शी संंबंधित नेमकं प्रकरण काय?
पंकज त्रिपाठी सन्मानित वाटत आहेत.
रस्ता सुरक्षा मोहिमेशी जोडल्याबद्दल अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणाले की, ‘अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरीजी आणि रस्ता सुरक्षा मोहिमेच्या संपूर्ण टीमसोबत पुन्हा एकदा हातमिळवणी करणे हा एक सन्मान आहे. रस्ता सुरक्षा हा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. या उपक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.’ असे अभिनेत्याने या मोहिमेबाबत आपले मत मांडले आहेत.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मुलांचे संरक्षण करणे आहे.
पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले की, ‘या मोहिमेचा उद्देश लोकांचे, विशेषतः मुलांचे जीवन सुरक्षित ठेवणे आहे. मी सर्व नागरिकांना रस्ता सुरक्षा स्वीकारण्यास सांगू इच्छितो, आपल्या देशाच्या भविष्याची म्हणजेच आपल्या मुलांची सुरक्षितता आणि कल्याण यातच दडलेले आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.
हे सेलिब्रिटी देखील या मोहिमेशी जोडलेले आहेत
पंकज त्रिपाठी आणि अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त, इतर अनेक सेलिब्रिटी देखील रस्ता सुरक्षेच्या उदात्त मोहिमेशी जोडलेले आहेत. या यादीत प्रसून जोशी, शंकर महादेवन, आर. माधवनसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी यात सहभागी झाले आहेत. या मोहिमेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये या लोकांनी आपला आवाज उठवला आहे. याशिवाय, आध्यात्मिक गुरू सद्गुरु आणि उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती देखील रस्ता सुरक्षा मोहिमेचा भाग बनल्या आहेत.