सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शो मध्ये मलायका अरोराने कबूल केले, “मी माधुरी दीक्षितसारखे केस कापायचे आणि...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन’ या त्यांनीच विकसित केलेल्या फॉरमॅटमध्ये या वीकएंडला प्रेक्षकांसाठी आणखी एक उत्कृष्ट डान्स, नाट्यमय वाद-विवाद आणि भावुक परफॉर्मन्सेसने भरलेला भाग सादर होणार आहे. हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात मलायका अरोरा इंडियाज बेस्ट डान्सर टीमचे प्रतिनिधित्व करते, तर गीता कपूर, सुपर डान्सरच्या छोट्या उस्तदांना मार्गदर्शन करते.
परीक्षकांच्या पॅनलवर रेमो डिसूझा सर्वोच्च स्थानी आहे, जो स्पर्धेत निष्पक्षता राहील याची दक्षता घेतो. या आठवड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा शो देशाला सलामी देईल. या उत्साहात भर घालण्यासाठी तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, गौरव खन्ना आणि निक्की तांबोळी हे सेलिब्रिटी मास्टरशेफ नोरा फतेही आणि जेसन डेरूलोसह या सेटवर येणार आहेत. तेजस्वी आणि दीपिका सुपर डान्सर टीमला तर निक्की आणि गौरव इंडियाज बेस्ट डान्सर टीमला समर्थन देताना दिसतील.
सोशल मीडिया स्टार जान्हवी मोदी आहे तरी कोण? बिकानेरमध्ये दिवसाढवळ्या अभिनेत्रीचे झाले अपहरण!
या आठवड्यात, स्पर्धकांना कोणतेही आव्हान दिले जाणार नाही. ते भारताच्या समृद्ध वारशातून स्फुरलेले परफॉर्मन्स सादर करतील. टीम सुपर डान्सरचे तेजस आणि परी यांनी एक जबरदस्त भांगडा परफॉर्म केला. तर, टीम इंडियाज बेस्ट डान्सरच्या प्रतीक आणि देबपर्णाने ‘खोया हैं’ गाण्यावर डान्स करून योग वारशाला आदरांजली वाहिली.
एक अभिनव प्रयोग करत सुपर डान्सर टीममधल्या तुषार आणि संचितने भारताच्या क्रिकेट इतिहासाला सलामी देत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विश्व चषक अंतिम फेरीच्या सामन्याच्या आठवणी ताज्या केल्या. टीम IBD च्या समर्पणने ‘ए वतन’ गाण्यावर परफॉर्म करून देशाच्या शहीद सैनिकांना भावपूर्ण सलामी दिली.
या भागात वैविध्यपूर्ण परफॉर्मन्स बघायला मिळतील. यात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, शिवाजी महाराजांचे शौर्य यांना समर्पित आणि भारतीय शेजारधर्माची झलक दाखवणारे परफॉर्मन्स सादर होणार आहेत. अलीकडे गाजलेल्या ‘नाटू नाटू’ या ऑस्कर विजेत्या गाण्यावरील परफॉर्मन्स देखील बघायला मिळेल. युवा बुद्धिबळपटू गुकेशने मिळवलेल्या विजयाचा देखील यावेळी गौरव करण्यात येईल.
सौम्या कांबळेने माधुरी दीक्षितला वाहिलेली आदरांजली हा या भागातील एक वेधक क्षण होता. तिच्या परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आपला ठसा उमटवला. टीमची मालकीण मलायका अरोराने जेव्हा सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिला किती प्रभावित केले होते हे सांगितले, तेव्हा सगळ्यांना आश्चर्यच वाटले.
मलाइकाने सौम्याचे कौतुक केले आणि आपल्याला लहानपणापासून माधुरी किती आवडत होती, हे सांगताना म्हटले, “माधुरी दीक्षित आवडत नाही, असे कुणीच नसेल. आपण तिला बघत, तिची नक्कल करत मोठे झालो. मला आठवते आहे, मी आरशासमोर उभी राहून तिच्या स्टेप्सची नक्कल करायचे. असे करण्याची संधी मी कधीच सोडायचे नाही. मी माझे केस देखील तिच्यासारखेच कापत असे, तिच्या स्टेप्सची आणि हावभावांची मी नक्कल करायचे. आपण सगळेच माधुरी दीक्षित फॅन आहोत!”