Malaika Arora Photos
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केलंय. मलायकाने अर्जुनसोबत आता ब्रेकअप केल्यानंतर अभिनेत्रीचं नाव एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत जोडलं जात आहे. दोघंही हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर येताना एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर मलायकाने नुकतंच गायक ए. पी. ढिल्लनच्या म्युझिक कॉन्सर्टला हजेरी लावली होती. या कॉन्सर्टवेळी मलायका पुन्हा एकदा त्याच मिस्ट्री मॅनसोबत एकत्र स्पॉट झाली आहे. त्याचं नाव राहुल विजय आहे.
या कॉन्सर्टवेळी गायकाने मलायकाला स्टेजवरही आमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे, ए. पी. ढिल्लनने तिच्यासाठी खास गाणंही म्हटलं. यावेळी त्याने भरकार्यक्रमात मलायका त्याची ‘बालपणीची क्रश’असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं. त्यानंतर दोघांनी स्टेजवर एकमेकांना मिठीसुद्धा मारली. यानंतर मलायकाने कथित बॉयफ्रेंड राहुल विजयसोबतचा सेल्फी शेअर केला. या दोघांच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे. मलायकाने ए. पी. ढिल्लनचंच ‘विथ यू’ हे गाणं शेअर करत राहुलसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राहुलनेही तो फोटो रिपोस्ट करत त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तो फोटो शेअर केला आहे.
ए. पी. ढिल्लनच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मलायकासोबत हजेरी लावलेला राहुल विजय नेमका कोण आहे ? याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका नेमकं कोणाला डेट करत आहे? असा प्रश्ना प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एपी ढिल्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरासोबत मिस्ट्रीमॅन राहुल विजय होता. स्नॅपचॅटवरही राहुलने मलायकाचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न मलायकाच्या चाहत्यांना पडला आहे. राहुल विजयबद्दल बोलायचे झाले तर, तो फॅशन स्टायलिस्ट तसेच क्रिएटिव्ह कन्सल्टर सुद्धा आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालने स्वत:च रचला आपल्या किडनॅपिंगचा प्लान? क्लिप व्हायरल
राहुलने २०११ मध्ये ‘हार्पर बाजार’ या फॅशन स्टायलिश वेबसाईटमध्ये प्रशिक्षणार्थी (Intern) म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो तिथे फॅशन ब्रँडचा एडिटरही बनला. त्यानंतर २०१७ मध्ये राहुलने ELLE India आणि नंतर GQ India मध्ये वरिष्ठ फॅशन एडिटर म्हणून काम पाहिले. २०२१ मध्ये, विजयने फ्रीलान्स फॅशन एडिटर म्हणून काम करण्यासाठी त्याने जॉब सोडून स्वत:चा बिझनेसही सुरू केला. राहुल लॅक्मे फॅशन वीकच्या तीन क्रिएटिव्ह डायरेक्टर्सपैकी एक आहे, जिथं त्याने प्रमुख डिझाईन्सची स्टाईल केली आहे. राजेश प्रताप सिंग, आशिष सोनी आणि कुणाल रावल यांचा खासगी फॅशन डिझायनर म्हणून त्याने काम पाहिले आहे.
दरम्यान, राहुल अनेक डिझाईन हाऊस, काही सेलिब्रिटी आणि अनेक ब्यूटी ब्रँड्ससाठी तो फ्रीलान्सर म्हणून काम करतो. त्याने शाहब दुराझी आणि तरुण ताहिलियानी यांसारख्या भारतातील काही सर्वोत्तम फॅशन डिझायनर्ससारख्या सेलिब्रिटी आणि ब्रँडसाठी काम करतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मलयका अरोरा आणि राहुल विजय एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनरसाठी स्पॉट झाले होते. मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर २०१८ साली अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुलने इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरला फॉलो केले आहे. यासोबतच त्याने अनेक वेळा अर्जुनची स्टाईलही केली आहे. यासोबतच त्याने वरुण धवन, अहान शेट्टी, वेदांग रैनासह अनेक स्टार्सची स्टाइल केली आहे. राहुलने सोशल मीडियावर मलायकाच्या अनेकदा पोस्टवर कमेंट केल्या असून मलायकानेही त्याच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.