प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालने स्वत:च रचला आपल्या किडनॅपिंगचा प्लान? क्लिप व्हायरल
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमेडियन सुनील पाल सध्या कमालीचा चर्चेत आलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हरिद्वारला एका खासगी कार्यक्रमासाठी जात असताना सुनील पालला काही लोकांनी किडनॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सुनील पाल याची किडनॅपर्सच्या तावडीतून सुखरुप सुटका झाली होती. अपहरणकर्त्यांनी कॉमेडियनला अपहरण करून २४ तासांसाठी ओलिस ठेवलं होतं. त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी लाखो रुपयांचीही मागणी केली होती. आयुष्यातील हा सर्वांत धक्कादायक अनुभव असल्याचं सुनिलने सुटकेनंतर म्हटलंय. अपहरणानंतर सुनील पाल यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, जी ऐकून सुनील पालनेच स्वतःचे अपहरण केल्याचे दिसते. आता त्याने या क्लिपमागचे सत्य सांगितले आहे.
सुनील पालची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. मुलाखतीत कॉमेडियनने सांगितलं की, ‘होय, लोकांनी मलाही ती क्लिप पाठवली आहे. आरोपीने अतिशय हुशारीने मला असे प्रश्न विचारले होते, जेणेकरून मी ती उत्तरे देऊ शकेन. मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत मला धमकावले जात होते. त्यामुळे मी अपहरणाबद्दल मौन बाळगण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्याचा वापर माझ्याविरोधात केला जात आहे. या कॉलबद्दल मी लोकांना सांगितले नाही कारण मी घाबरलो होतो. माणसाच्या डोक्यावर बंदूक ठेवली तर तो काहीही करायला तयार असतो, मीही तेच केलं.”
प्रेम असावं तर असं… ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकारने थापल्या सानिकासाठी ‘इतक्या’ भाकऱ्या
सुनील पाल पुढे म्हणाला की, “माझ्यावर आरोप केला जात आहे की मी हे सर्व माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केले आहे. पण हे सगळं घडण्याच्या एक दिवस आधी माझा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मी हे सर्व का करू? हा कॉल मला धमकी देण्यासाठी देखील होता, ज्यामध्ये तो मला सांगत आहे की, तो माझ्या आसपास आहे. माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी मी कोणाचेही नाव घेणार नाही, असेही त्याने मला सांगितले. मात्र, आता मी लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्याकडून मला येणाऱ्या प्रत्येक मेसेज आणि कॉलबद्दल पोलिसांना अपडेट केले आहे. हे हुशार लोक आहेत, मला चुकीचे दाखवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
भारतात या ठिकाणी ‘पुष्पा 2’ ला मिळाली टक्कर, 40 कोटी बजेटच्या चित्रपटाने टाकले मागे!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑडिओ क्लिपमध्ये सुनील पाल अपहरणकर्त्याशी बोलताना ऐकू येत आहे. यामध्ये सुनील अपहरणकर्त्याला म्हणतो, कोणाला काहीही सांगितलं नाही, जेव्हा मला कोणी येऊन भेटतं त्यावेळी काही तरी सांगावं लागतं ना. यावर अपहरणकर्ता म्हणतो- हो सर, मुद्दा हा आहे की तुम्ही सांगितले तसे आम्ही केले, पण तरीही तुम्ही हे करत आहात, हे चुकीचे आहे, नाही का? तेव्हा सुनील पाल म्हणतात- घाबरू नका… घाबरू नका… मी तुमच्यापैकी कोणाचे नाव घेतले नाही. आणि इतर कोणाकडूनही काहीही सापडले नाही. मी हे आत्ताच सांगितले आहे आणि पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
‘स्पायडर मॅन 4’ ची वाट पाहत आहात? चित्रपटाबाबत समोर आली खास बातमी!
सुनीलचे बोलणे ऐकून अपहरणकर्ता म्हणतो- तू तुझ्या पत्नीला सांगितले नाहीस का? तुम्ही त्यांना पहिलेच या प्रकरणात समाविष्ट केले नव्हते का? बायकोने हे सगळं केलं? यावर सुनील पाल म्हणतो- अरे, सोशल मीडिया आणि सायबर लोकांनी पकडले आहे. मित्र वगैरे सर्वांनी सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधला. मग काहीतरी सांगावे लागेल. सुनीलला अपहरणकर्ता म्हणतो- होय, ठीक आहे. तुम्ही बघा आणि मग तुम्हाला वाटेल ते करा. आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही म्हणाल तसे करू. तसे, आपण कधी भेटू? तर सुनील पाल म्हणतात – ही योग्य वेळ नाही.