malaika arora photo
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ट्रोलिंगवर फार लक्ष देत नाही. सोशल मीडियावर अनेकदा मलायकाचे प्रेमसंबंध, ड्रेसिंग, फॅशन, बोल्ड फोटोशूट यांची चर्चा सुरु असते. सध्या मलायका चर्चेत असण्याचं एक वेगळं कारण आहे. आता मलायका नव्या शोमधून (Malaika Arora New Show)प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये ती ट्रोलर्सना उत्तरं देताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो समोर आला आहे.
मलायका अरोराने आणि डिस्ने प्लस हॉटस्टारने ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने, “आता तुम्हाला माझं खरं रुप दिसेल” असं सांगितलं आहे. मलायका अरोराच्या आगामी शोच्या प्रोमोमुळे आता यो शोमध्ये मलायका नक्की काय खुलासे करणार? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
If you thought #Malaika was done making news with her moves, you have another think coming! Age, clothes, love life are all old news, She is bringing something new for all of you to talk about – #HotstarSpecials #MovingInWithMalaika, starts Dec 5th. pic.twitter.com/6xO3vlhzkr
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) November 17, 2022
या व्हिडीओमध्ये मलायका सांगते, “माझं ब्रेकअप असो किंवा माझं बॉयफ्रेंडसोबतचं रिलेशन, कधी मी कशी चालते यावरून तर कधी माझे कपडे कसे आहेत यावरून मला ट्रोल केलं जातं. ट्रोलर्स नेहमीच माझ्या मागे लागलेले असतात. पण आता मी तुम्हाला बोलण्यासाठी नवीन काहीतरी आणलं आहे. सर्वांना आता माझं खरं रुप दिसणार आहे.”
[read_also content=”एसटीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर यादी एका क्लिकवर https://www.navarashtra.com/maharashtra/decisions-about-msrtc-taken-by-chief-minister-eknath-shinde-nrsr-346131/”]
व्हिडीओ शेअर करताना मलायकाने लिहिलं, “जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या प्रत्येक कृतीची बातमी होत आहे, तर तुमच्यासाठी आणखी बरंच काही आहे. वय, लव्ह लाईफ, या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आता मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. जिथे आपण सर्व गोष्टींबद्दल बोलू शकता.”