"हा कुठला इतिहास आहे?", आस्ताद काळेच्या 'छावा' चित्रपटाबद्दलच्या पोस्ट व्हायरल; केली थेट टीका
२०२५ या वर्षातील जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडित काढत विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ चित्रपटाने मजल मारली आहे. आतापर्यंत एकाही चित्रपटाने त्याच्या पेक्षा जास्त कमाई केलेली नाही. सर्वाधिक गाजलेल्या ह्या चित्रपटाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. काही मराठी कलाकारांनी चित्रपटामध्ये, नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यामध्ये अस्ताद काळेचाही समावेश होतो. आता अभिनेत्याने दोन महिन्यांनंतर फेसबूकवर काही पोस्ट शेअर करत, चित्रपटाच्या टीकांवर भाष्य केलं आहे. त्याने फेसबूकवर पोस्ट लिहित चित्रपटातील चुका दाखवल्या आहेत.
‘टायगर इज बॅक…’, सलमान खानने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली; भाईजानच्या बायसेप्सने वेधले लक्ष
अभिनेता आस्ताद काळेने ‘छावा’ चित्रपटात सूर्या भूमिका साकारलीये. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी खटकलेल्या मुद्द्यांवर अभिनेत्याने भाष्य केलं आहे. फेसबूकवर अभिनेत्याने एक दोन नाही तर पाच पोस्ट शेअर केलेल्या आहेत. पोस्ट शेअर करत अभिनेत्याने न पटलेल्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आस्ताद काळे म्हणतो,
“हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं????????!!!! काय पुरावे आहेत याचे????!!!!”
“औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगानी चालू शकेल?”
actor aastad kale criticize chhaava movie inspite of having role in the film
“मी आता खरं बोलणार आहे… ‘छावा’, वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.”
actor aastad kale criticize chhaava movie inspite of having role in the film
“सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका random नदी काठी???!!! असं नाही व्हायचं हो!!!!!”
“सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून “पान लावतायत?” आणि ते खातायत? हे कसं चालतं??!!!!”
actor aastad kale criticize chhaava movie inspite of having role in the film
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज
अभिनेत्याच्या ह्या फेसबूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान अभिनेत्याने शेअर केलेल्या सर्व पोस्ट डिलीट केलेल्या आहेत. आस्तादने शेअर केलेल्या पोस्ट्सवर नेटकऱ्यांनी “एवढ्या गोष्टी खटकल्या तर तू काम नव्हतं करायचं… हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं”, “अरे मग तू का या चित्रपटामध्ये काम केलंस?”, “चित्रपट येऊन बरेच दिवस झाले आज का बोलतोय?’ अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.