Salman Khan Flaunts Biceps In Recent Photo
बॉलिवूडच्या भाईजानला विशेष ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कालच वरळी वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अभिनेत्याच्या कारला उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्या दरम्यानच अभिनेत्याने आता इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याने जिममध्ये व्यायाम करताना एक फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, ‘आलेच मी’ शानदार लावणी रिलीज
सलमान खानची गाडी बाँबने उडवून देऊ, अशा धमकीचा फोन वरळी पोलिसांना आला. गेल्या वर्षभरापासून सलमानच्या जीवाला धोका आहे. सतत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमक्यांचे मेसेजेस, मेल, कॉल मिळत आहे. आता अशातच अभिनेता आपल्या दमदार शरीरयष्टीवरुन चर्चेत आला आहे. सलमानने काही तासांपूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बायसेप्स दाखवतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजेच,त्याने ट्रोलर्सला दिलेलं जबरदस्त उत्तर आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी सध्या कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
‘करुन टाका भावना- सिद्धूचं लग्न…’, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतला हटके ट्वीस्ट पाहून चाहतेही खूश
सलमान खान कायमच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असतो. तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आपले स्टायलिश फोटो शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. भाईजानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आपली बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याची बॉडी पाहून फक्त चाहतेच नाही तर अनेक चाहतेही थक्क झाले आहेत. त्याने फोटो शेअर करताना ‘प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद’ असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. जिममध्ये तो अक्षरश: घाम गाळत असून शरीरावर मेहनत घेत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो काहीसा थकलेला दिसत आहे. वयाच्या ५९ व्या वर्षीही सलमान खान कमालीचा फिट आहे. त्याची बॉडी पाहून ट्रोलर्सही अचंबित झालेत.
आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या ‘आता थांबायचं नाय’चा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, सलमान खानने शेअर केलेल्या फोटोंवर राघव जुयाल, वरुण धवन, तर रणवीर सिंगने ‘हार्ड हार्ड’ अशी कमेंट केली आहे. सलमान खानने शेअर केलेल्या फोटोवर लाखो लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे. तर कमेंट्सचाही वर्षाव करण्यात आलेला आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या स्टारडमची पुन्हा एकदा प्रचिती आलेली आहे. अभिनेत्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर, भाईजान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही. चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च अद्याप अर्धाही वसूल झालेला नाही. त्याच्या कमाईचा आकडा पाहून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे, असं बोलावंच लागेल. आता भाईजान लवकरच ‘टायगर व्हर्सेस पठान’, ‘किक २’, आणि संजय दत्तासोबत पुढील चित्रपटात दिसणार आहे.