Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज पाहिलात का? सोशल मीडियावर लुकची जोरदार चर्चा

मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या अपकमिंग सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या आगामी सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 11, 2024 | 04:16 PM
संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज पाहिलात का ? सोशल मीडियावर लूकची जोरदार चर्चा

संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज पाहिलात का ? सोशल मीडियावर लूकची जोरदार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

सिनेमांतल्या भूमिकांसाठी कलाकार काय-काय करत असतात. एखादं दृश्य खरं वाटावं यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो.

आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा – वडील पोलिस, बायको डॉक्टर तर स्वत: वकील; बिग बॉस १८ च्या घरात चर्चेत राहिलेले गुणरत्न सदावर्ते कोण आहेत ?

दमदार भूमिकेत संतोष जुवेकर

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी ॲक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्वीकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.

काय म्हणाला भूमिकेबाबत संतोष

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो की, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते, दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह द्विगुणित होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.

पाहा रानटीचे टीझर

रानटी साठी केले या कलाकारांनी काम 

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. तर सध्या संतोष जुवेकरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की!

Web Title: Marathi actor santosh juvekar first look out of raanti marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 04:11 PM

Topics:  

  • santosh juvekar

संबंधित बातम्या

‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”
1

‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”

महाराष्ट्र राज्य पूरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक प्रतिक्रिया, “ज्या साठी केला अट्टहास…”
2

महाराष्ट्र राज्य पूरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक प्रतिक्रिया, “ज्या साठी केला अट्टहास…”

“हीच माऊलींची सेवा…” अनाथ- आदिवासी मुलांसाठी अभिनेत्याचा ‘एक हात मदतीसाठी’; चाहत्यांना केलं आवाहन
3

“हीच माऊलींची सेवा…” अनाथ- आदिवासी मुलांसाठी अभिनेत्याचा ‘एक हात मदतीसाठी’; चाहत्यांना केलं आवाहन

‘छावा’नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज
4

‘छावा’नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.