Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baplyok Movie : राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात ‘बापल्योक’चा डंका, ७ पुरस्कारांवर पाडली छाप

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा आणि अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा राज्य सरकारचा ५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बापल्योक' चित्रपटाने विशेष छाप पाडली.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 26, 2024 | 07:44 PM
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक'चा डंका

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक'चा डंका

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा आणि अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा राज्य सरकारचा ५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये दिमाखात पार पडला. यावेळी पुरस्कार सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने विशेष छाप पाडली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या द्वितीय पुरस्कारासह चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय), संवाद, पार्श्वसंगीत, कथा, गीत, सहाय्य्क अभिनेता अशा तब्ब्ल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

हे देखील वाचा – ‘हम दोनो दो प्रेमी…’ निक्की आणि अभिजीतच्या जोडीने घरातल्या सदस्यांची बोलती बंदी, पाहा Video

चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने म्हणाले की, “उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘बापल्योक’ चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने यशाची मोहोर उमटवली असतानाच, मानाच्या राज्य शासनाच्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये मिळालेले यश आम्हाला अनेक नव्या चांगल्या कलाकृतींसाठी बळ देणारं आहे.”

 

मराठी चित्रपट चांगल्या आशय विषयांवर चालतात हे लक्षात घेऊनवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा यापुढेही मानस असल्याचे निर्माते विजय शिंदे यांनी सांगितले. पुरस्काराबद्दल सांगताना दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले की, ” ‘बापल्योक’ सारखा दमदार चित्रपट सिनेरसिकांपर्यंत पोहोचावा यासाठी घेतलेल्या अथक मेहनतीचे चीज होताना दिसतेय. अशा पुरस्कारांमुळे काम करायला ऊर्जा मिळते. या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाचा आणि माझ्या आजवरच्या वाटचालीत साथ देणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.”

हे देखील वाचा – Rajkumar Rao नावात आडनावाचा का वापर नाही करत ? स्वत:च सांगितलं कारण

‘बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Web Title: Marathi movie bapalyok won 7 awards at the 58th maharashtra state marathi film awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 07:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.