सौजन्य- सोशल मीडिया
बिग बॉसच्या घरातला दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरातून जसजशे स्पर्धक नॉमिनेट होत चालले आहेत तसतसा आता खेळ आणखीनच कठीण होतोय. चार आठवड्यांत आतापर्यंत १६ पैकी ४ स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत. नुकत्याच काल झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेशने ‘भाऊचा चक्रव्ह्यूह’ नावाची खोली उघडली. या खोलीत जाणारी पहिली स्पर्धकही निक्कीच होती.
यावेळी निक्कीला त्या रूममध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तिच्यामागे तिचे मित्र काय बोलतात ? हे दाखवलं. त्यामुळे तिच्या मनात टीम A बद्दल मोठ्या प्रमाणावर राग आहे. तिने टीम A सोडली असून तिने बिग बॉसच्या आणखी एक म्हणजेच तिसरी टीम तयार केली आहे. त्या टीममध्ये निक्की आणि अभिजीत सावंत आहे. या दोघांचीही कालच्या एपिसोडनंतर जोडली जमली आहे. त्यांच्या जोडीमुळे घरातील अनेक सदस्यांचा जळफळाट झालेला दिसत आहे.
हे देखील वाचा – Rajkumar Rao नावात आडनावाचा का वापर नाही करत ? स्वत:च सांगितलं कारण
सोशल मीडियावर आजच्या एपिसोडचा काही तासांपूर्वी प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, अभिजित आणि निक्की घरातल्या गार्डन परिसरात बसलेले दिसत आहे. तिथे बसून दोघेही मस्त गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचवेळी बिग बॉस म्हणतात, “अभिजित आणि निक्की जोडीत बांधले गेले आहेत. या परिस्थितीवर तुम्हाला कोणतं गाणं सुचतंय ?” तर बिग बॉसच्या ह्या प्रश्नावर अभिजीत म्हणतो, “हम दोनो दो प्रेमी…” अभिजितचं हे उत्तर ऐकून घरात जोरदार हशा पिकतो.
अभिजीतने दिलेल्या उत्तरावर अंकिता म्हणते, “आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात…” त्यावर अभिजीत ‘कुछ तो लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. घरात हलकंफुलकं वातावरण असताना टीम A मधील सदस्यांचा चेहरा मात्र पडलेला दिसतोय. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.