Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाद’ म्हणजे काय ? Naad- The Hard Love चा टीझर उलगडणार प्रेमाची नवी व्याख्या

गेल्या अनेक दिवसांपासून 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा होत असताना, या चर्चांदरम्यान आता चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टीझर प्रेक्षकांना एक म्युझिकल लव्हस्टोरी दाखवतो.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 26, 2024 | 04:29 PM
संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; 'नाद - द हार्ड लव्ह' चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; 'नाद - द हार्ड लव्ह' चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

‘नाद – द हार्ड लव्ह’ नावातच हटकेपणा, चित्रपटाच्या घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील अनेक गाणी रिलीज झाली. आता सोशल मीडियावर चित्रपटातला लक्षवेधी टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भुमिकेत ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडसोबत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक तगडी स्टारकास्ट आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा होत असताना, या चर्चांदरम्यान आता चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टीझर प्रेक्षकांना एक म्युझिकल लव्हस्टोरी दाखवतो.

हे देखील वाचा – दिव्या दत्ताने इंडिगो एअरलाइन्सवर व्यक्त केला संताप, म्हणाली- ‘विमानतळावर गैरवर्तन होते…”

ही आगळीवेगळी लव्हस्टोरी चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. ‘नाद’चं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. टीझरच्या सुरुवातीला ‘नाद’ची व्याख्या दाखवण्यात आली आहे. अर्थात थोडक्यात कथानकाचा गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता आणि त्यावर बुलेटची सवारी करणारा नायक लक्ष वेधून घेतो. दुसरीकडे शीर्षकाची व्याख्या उलगडत जाते.

 

‘नाद’ म्हणजेच ध्यास जेव्हा श्वासातून रक्तात उतरतो, तेव्हा काय होतं ते टिझरमध्ये सांगितलं आहे. थोडक्यात काय तर गावाकडच्या लाल मातीत, हिरवा शालू नेसलेल्या शेतात रंगलेली रांगडी प्रेमकथा ‘नाद’मध्ये पाहायला मिळणार असल्याचं टिझर पाहिल्यावर जाणवतं. टिझरला देण्यात आलेली काव्यात्मक संवादांची जोड तो अधिकच खुलवण्यास मदत करते. खळखळ वाहणारी नदी, नदी किनारी असलेले अवाढव्य खडक आणि त्यावर बसून रोमान्स करणारं कपलही यात दिसत आहे. प्रेम हा शब्द लिहायला, वाचायला, म्हणायला जरी सोपा असला तरी प्रेम झाल्यावर किती आव्हानांना सामोरं जावं लागतं त्याची झलकही यात आहे. गुलाबी प्रेमाच्या या रक्तरंजित कहाणीमध्ये हाणामारीही पाहायला मिळणार आहे. सुरेल गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. ‘नाद’चा टिझर सर्वार्थाने चित्रपटाचा चेहरा ठरणारा असल्याचे दिग्दर्शक प्रकाश पवार यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची मधुरा जसराज यांच्यासाठी खास पोस्ट, शेअर केल्या खास आठवणी

‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी, तर पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं असून ही सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड आणि सपना माने या नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात रसिकांना भुरळ पाडणार आहे. याखेरीज यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग आदी कलाकारांनीही या चित्रपटामध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Marathi movie naad the hard love teaser release in social media see video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 04:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.