Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी, ‘तू भेटशी नव्याने’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमध्ये सुंदर प्रेमकहाणी दाखवण्यात येणार असून, 'तू भेटशी नव्याने’ ही संपूर्ण मालिका एआयच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 05, 2024 | 10:07 AM
एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी, ‘तू भेटशी नव्याने’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
Close
Follow Us:

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली गेली आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेबद्दल बोलताना सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकार म्हणाले की, सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. असाच एआयचा एक वेगळा प्रयोग ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने करत असून केवळ तंत्रज्ञान वापरायचं म्हणून हा प्रयोग केलेला नाही तर क्रिएटिव्ह टीमची मेहनत यामध्ये दिसणार आहे. तंत्रज्ञानाप्रमाणे मालिकेची कथा ही तितकीच दमदार असायला हवी हे आम्ही कटाक्षाने पाळलं आहे. असे ते म्हणले.

तसेच पुढे, वेगळी कथा आणि उत्तम तंत्रज्ञान याचा मिलाफ असलेली ही मालिका प्रेक्षकांचं नक्की मनोरंजन करेल असा विश्वास सोनी मराठी वाहिनीच्या फिक्शन हेड सोहा कुळकर्णी यांनी व्यक्त केला. यानंतर पहिल्यांदा एआयवर आधारित मालिकेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले. सुबोध भावे यांच्यासोबाबत काम करण्याचा आनंद आणि दडपण दोन्ही असल्याचे या मालिकेमध्ये मुख्यभूमीक साकारणारी शिवानी सोनार या अभिनेत्रीने सांगितले.

पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव यांनी केले आहेत.

या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट आणि मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची, हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्याची प्रत्येक मालिका खास असते आणि ती अनेक प्रेक्षकांना आवडते. तसेच सुबोध आणि शिवानी वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हा चेहरा आहे. आता हे दोघेही ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहेत ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहे. या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे. शिवानी सोनार गौरी या भूमिकेत दिसणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत. एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत.

या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती. ६ मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होते. अभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने ६ मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केला. त्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं, हे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितले. या व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसला, मात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हता, तर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधली. तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिका-चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली.

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Web Title: A unique love story that will unfold through ai tu bhetashi navyane will come to the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 10:07 AM

Topics:  

  • sony marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.