(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कायम चर्चेत असलेली अमृता पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बातमीने चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद झाला आहे. अमृताने तिच्या मित्र मंडळीच्या सिनेमांत एक खास गाणं सादर करणार आहे. “चिऊताई चिऊताई दार उघड” अस या गण्याच नाव आहे. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा आइटम साँग करणार आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत यात शंका नाही. आता ती आइटम साँग मधून प्रेक्षकांवर भुरळ घालणार आहे.
‘…यांना देशाबाहेर काढा’, रणवीर अलाहबादिया- समय रैना प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य
सुपरहिट लावण्या सादर केल्या नंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुशीला- सुजीत मधल हे आइटम साँग नक्कीच काहीतरी कमाल करणार आहे आणि नेहमी पेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसतेय आहे. तिचा नवा लूक आणि नव नाव यातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं आहे आता अमृता या नव्या आइटम साँग मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही.
Chhaava: ‘छावा’ने तिसऱ्या रविवारी देखील केला धमाका; या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून रचला इतिहास!
अमृताया गाण्यात तिच्या आवडत्या मित्रा सोबत म्हणजे गश्मीर महाजनी सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. सुशीला सुजीत मध्ये ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणं नक्कीच धम्माल करून जाणार आहे असं दिसत आहे. वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा कोणताही नृत्यप्रकार अमृता कायम तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना मोहित करत आली आहे आणि आता पुन्हा एकदा या पहिल्या वहिल्या आइटम साँग मधून अमृता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही. सुशीला – सुजीत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करत आहे.