फोटो सौजन्य - Social Media
'संगीत मानापमान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचबरोबर या चित्रपटाबाबत खास बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार चमकणार आहेत.
‘संगीत मानापमान’ हा एक सांगीतिक चित्रपट असून यात सुबोध भावे, सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुळकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.
याचबरोबर या चित्रपटामध्ये आणखी एका सुंदर मराठी अभिनेत्री देखील खास भूमिकेत दिसणार आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अमृता खानविलकर असणार आहे.
अमृता खानविलकर 'संगीत मानापमान' या चित्रपटामध्ये खास अंदाजात, खास भूमिकेत दिसणार आहे. या बातमीने अभिनेत्रीच्या चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे.
अमृता खानविलकरची 'संगीत मानापमान' या चित्रपटामधील भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.