Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटात आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या दमदार भूमिकेत!

मराठी आगामी चित्रपट 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आनंद पिंपळकर हे कृष्णशास्त्री पंडित यांची दमदार भूमिका साकारणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 24, 2024 | 11:35 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंदजी सांगतात, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण आणि विशेष आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.’ असे त्यांनी सांगितले.

 

हे देखील वाचा – तांबड्या मातीतील अस्सल रांगडा खेळ दर्शवणारं बिग हिट मीडियाचे ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा!

या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे या राजमाता जिजाऊ, भार्गवी चिरमुले ही धाराऊ माता, पल्लवी वैद्य ही सईबाई भोसले, कृतिका तुळसकर ही महाराणी सोयराबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Anand pimpalkar will be seen in the powerful role of krishna shastri pandit in the movie dharmakshak mahavir chhatrapati sambhaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • marathi entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन, जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांनाच भावली
1

पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन, जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांनाच भावली

प्रत्येकाला ताल धरायला लावणारं “छबी”मधील “होय महाराजा” गाणं लाँच, चित्रपट कधी होणार रिलीज?
2

प्रत्येकाला ताल धरायला लावणारं “छबी”मधील “होय महाराजा” गाणं लाँच, चित्रपट कधी होणार रिलीज?

मंत्री आशिष शेलार यांच्या नव्या घोषणेने महाराष्ट्रातील सिनेमा व्यवसायावर मोठा परिणाम होणार
3

मंत्री आशिष शेलार यांच्या नव्या घोषणेने महाराष्ट्रातील सिनेमा व्यवसायावर मोठा परिणाम होणार

“तुम्ही प्रेम करता म्हणजे नक्की काय करता…?” ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
4

“तुम्ही प्रेम करता म्हणजे नक्की काय करता…?” ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.