• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Audience Will Be Entertained A Lot On Ultra Jhakaas In The Month Of August

ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचं होणार भरपूर मनोरंजन, ‘अल्ट्रा झकास’वर पाहायला मिळणार कंटेंटचा वर्षाव

मराठी सिनेमाचा कल्ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि त्यांचं भरभरून मनोरंजन होणार आहे हे नक्कीच, कारण 'अल्ट्रा झकासवर' ऑगस्ट महिन्यापासून नवनवीन कंटेंट पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 01, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘ऑगस्ट’ महिन्यात प्रेक्षकांचं होणार भरपूर मनोरंजन
  • ‘अल्ट्रा झकास’वर मिळणार नवनवीन चित्रपट
  • जाणून घ्या ‘अल्ट्रा झकास’ कोणते चित्रपट कधी असेल.

‘ऑगस्ट’ महिना म्हणजे पावसाळ्याचा अखेरचा सडा, सणांची चाहूल आणि गणरायाच्या आगमनाची उत्सुकता. अगदी याच जल्लोषात अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवरही धमाकेदार कंटेंटचा उत्सव साजरा करणार आहे. या महिन्यात प्रत्येक शुक्रवार प्रेक्षकांसाठी असणार आहे मराठमोळे सुपरहिट सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथ, बांग्लामधील ब्लॉकबस्टर हिट्स पाहायला मिळणार आहे आणि हे तुमच्या मायबोली मराठी भाषेत. आता गणपतीच्या स्वागताची तयारी करताना तुमचं मनोरंजनही एकदम झकास होणार आहे.

क्लब 52 : दोन मित्रांच्या जुगाराच्या अंधाऱ्या दुनियेतला थरार
चित्रपटगृहात प्रेक्षकांची मनं जिंकत यशस्वी ठरलेला ब्लॉकबस्टर ‘क्लब 52’ आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर १ ऑगस्ट २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमित वाल्मीक कोळी दिग्दर्शित हा मराठी फुल ऑन ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात दोन जवळचे मित्र यशाच्या झटपट शोधात अंडरग्राउंड जुगाराच्या धोकादायक दुनियेत पाऊल टाकतात. यशाची गाडी सुरुवातीला वेगात धावते, पण लालसेने, विश्वासघाताने आणि जुगाराच्या गूढ वास्तवाने त्यांची मैत्री पोखरायला सुरुवात होते. प्रत्येक निर्णयात त्यांचे नुसते पैसेच नाही, तर चारित्र्य आणि भविष्यही पणाला लागते. एक चुकीचा डाव त्यांचे आयुष्य कायमचं बदलू शकतो, हे अधोरेखित करणारी ही कथा आहे. चित्रपटात भरत ठाकूर, हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री वेणुगोपाल आणि नितीन रूपनवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘माझा सर्वोत्तम वाढदिवस…’, कियाराने गोंडस मुलीसोबत अशा पद्धतीने साजरा केला वाढदिवस, शेअर केले खास फोटो

अदृश्य चेहरा (आयडेंटिटी) : आठवणींमधून उलगडणाऱ्या खुन्याच्या शोधाची कहाणी
अदृश्य चेहरा (आयडेंटिटी) हा अखिल पॉल, अनस खान दिग्दर्शित अ‍ॅक्शन, क्राइम मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. टोविनो थॉमस, त्रिशा कृष्णन, विनय राय, अजू वर्गीस आणि मंदिरा बेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक स्केच आर्टिस्ट आणि एक पोलिस अधिकारी एका क्रूर हत्याकांडामागील अज्ञात खुनीचा चेहरा उलगडण्यासाठी प्रयत्न करत असतात. गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार आपल्या मनात खोलवर कोरलेल्या चेहऱ्याच्या आठवणीवरून ते खुन्याचा शोध घेतात. तपासाची ही अनोखी पद्धत आणि वेळेच्या विरुद्ध चाललेली शर्यत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. मानवी मनाच्या स्मरणशक्ती आणि गुन्हेगारीच्या गुंतागुंतीचं प्रभावी चित्रण करणारा हा चित्रपट ८ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या मायबोली मराठीत प्रदर्शित होणार आहे.

कोण होती ती? (वो कौन थी) : पाप, पश्चाताप आणि अज्ञात सावल्यांची कहाणी
कोण होती ती? (‘वो कौन थी?’) हा दीपक रामसे दिग्दर्शित हिंदी हॉरर चित्रपट आहे. चित्रपटात एका प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे आयुष्य एका रात्रीच्या अपघाताने बदलून जाते, जिथे त्यांच्या हातून एक तरुणी जखमी होते आणि ते घाबरून पळून जातात.अपघातानंतर पळून गेल्यावर त्यांच्याभोवती भीतीदायक घटना घडायला लागतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या चुकांची किंमत मोजावी लागते. असाच मानवी अपराध आणि अज्ञात शक्तींमधील ही थरारक झुंज दाखवणारा ‘वो कौन थी?’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुनीत तेजवानी, मधु शर्मा आणि एलेना विक्रम कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सावट मृत्यूचे (मिशन एक्स्ट्रीम) : धडकी भरवणारी कारवाई आणि राष्ट्ररक्षणासाठीचा झगमगता लढा
सावट मृत्यूचे (मिशन एक्स्ट्रीम) हा फैसल अहमद, सनी सानवार दिग्दर्शित अ‍ॅक्शन बांग्ला भाषेतील चित्रपट आहे. आरिफिन शुवू, ओइशी, नबिला, तास्कीन, मिषा आणि सुमित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात, ‘ढाका अटॅक’ नंतर अबिद रहमानला देशावर एका नव्या अदृश्य धोक्याची चाहूल लागते. या नव्या संकटाचा सामना करताना, त्याला केवळ स्फोटकांचा नाही, तर मानसिक दबाव, धोके आणि गुप्त कटांचाही सामना करावा लागतो. उत्कंठावर्धक घडामोडींनी भरलेला आणि राष्ट्रहितासाठी प्राण पणाला लावणाऱ्या योध्यांची प्रेरणादायी कहाणी सांगणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे.

सत्य घटनेवर आधारित Tehran चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, जॉन अब्राहम दिसणार मुख्य भूमिकेत

अखेरची आशा (नो वे आऊट) : संकटात अडकलेला माणूस आणि नियतीचा धक्कादायक खेळ
अखेरची आशा (नो वे आऊट) हा नितीन देविदास दिग्दर्शित मल्याळम भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. रमेश पिशारोडी, धर्मजन बोलगट्टी, बेसिल जोसेफ आणि रवीना नायर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात ‘डेव्हिड’ या तरुण उद्योजकाची कहाणी मांडण्यात आली आहे. लॉकडाऊनपूर्वी व्यवसायात केलेल्या १ कोटींच्या गुंतवणुकीनंतर आलेल्या महामारीमुळे डेव्हिड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतो. निराश आणि थकलेला डेव्हिड शेवटचा निर्णय घेणार असतो, पण तेव्हाच त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही भावनिक आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाते. २९ ऑगस्ट २०२५ ला हा सुपरहिट चित्रपट मराठीत अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “पावसाळ्याचा शेवट आणि सणांची सुरुवात अशा जल्लोषाच्या वातावरणात प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी आम्ही खास मराठमोळा, दर्जेदार आणि थरारक कंटेंट घेऊन आलो आहोत. शिवाय ‘अल्ट्रा झकास’वर सादर होणाऱ्या प्रत्येक कथेमुळे केवळ करमणूक होणे इतकाच आमचा उद्देश नाही, तर ती कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी, त्यांना विचार करायला लावणारी आणि मनात दीर्घकाळ रेंगाळणारी असावी.”

Web Title: Audience will be entertained a lot on ultra jhakaas in the month of august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एंट्री, लवकरच सुरु होणार नवा अध्याय
1

लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एंट्री, लवकरच सुरु होणार नवा अध्याय

Tula Na Kale: अजिंक्य राऊतचं नवीन प्रेमगीत ‘तुला ना कळे’ प्रदर्शित; सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा
2

Tula Na Kale: अजिंक्य राऊतचं नवीन प्रेमगीत ‘तुला ना कळे’ प्रदर्शित; सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी
3

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
4

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ॲसिडिटीमुळे सतत करपट ढेकर- जळजळ होते? जेवणानंतर ‘या’ बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करून मिळवा आराम, वेदनांपासून मिळेल मुक्ती

ॲसिडिटीमुळे सतत करपट ढेकर- जळजळ होते? जेवणानंतर ‘या’ बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करून मिळवा आराम, वेदनांपासून मिळेल मुक्ती

Nov 15, 2025 | 05:30 AM
अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

Nov 15, 2025 | 04:15 AM
सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान

सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान

Nov 15, 2025 | 02:35 AM
बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

Nov 15, 2025 | 01:15 AM
TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Nov 14, 2025 | 11:21 PM
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.