Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रीची भन्नाट गोष्ट सांगणार… नात्याचा गुंता सुटणार! ‘बाप्या’ चित्रपटाचा ट्रेलर आला समोर

नात्यांचा गुंता, प्रेम आणि मैत्रीची वेगळी मांडणी करणारा ‘बाप्या’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने कथानकाची झलक देत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 28, 2026 | 03:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नात्यांचा गुंता, प्रेमाची ओढ आणि मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री एका वेगळ्या अंदाजात मांडणारा ‘बाप्या’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच प्रेक्षकांच्या नजरेत आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये कथानकाची एक झलक पाहायला मिळते आणि ही कथा नेहमीसारखी सरळ नसून नात्यांच्या गुंतागुंतीतून पुढे सरकणारी आहे, हे स्पष्ट होते.

निर्माते निखिल नंदा मांडणार Sanjay Dutt च्या ‘Aakhri Sawaal’ मधून RSS चा न पाहिलेला इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

चित्रपटात राजश्री देशपांडे साकारत असलेली ‘बाप्या’ ही व्यक्तिरेखा कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. ‘शैलजा ते शैलेश’ असा तिचा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या बदलामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये मोठी उलथापालथ होते. तिचं लग्न गिरीश कुलकर्णी यांच्या पात्राशी झालेलं असतं आणि त्यांना एक मुलगाही असतो. मात्र, गिरीशच्या आयुष्यातील दुसरा पैलू समोर येताच कथेला वेगळंच वळण मिळतं. इथूनच नात्यांमधील ताण, संघर्ष आणि गोंधळ वाढताना दिसतो.

ट्रेलरमध्ये “आपली यारी… गावावर भारी!” ही ओळ विशेष लक्ष वेधून घेते. या ओळीतून मैत्रीचा महत्त्वाचा धागा संपूर्ण कथेला जोडून ठेवतो, असे जाणवते. नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीत मैत्री कशी आधार देते आणि प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काय बदल घडवते, याची उत्सुकता ट्रेलरमुळे निर्माण होते. हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच भावनिक क्षणांचीही सुंदर सांगड घालण्यात आली असून, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

या चित्रपटात देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसते आणि कथेला अधिक वजन मिळते. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले आहे, तर मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

दिग्दर्शक समीर तिवारी यांनी ‘बाप्या’बद्दल बोलताना सांगितले की, ही कथा नात्यांभोवती फिरणारी असली तरी ती सरळसोट नाही. प्रत्येक नात्यामध्ये असलेली गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न त्यांनी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शैलजा ते शैलेश’ हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नसून स्वीकार, बदल आणि स्वतःला समजून घेण्याचा आहे. या कथेत प्रेम, मैत्री, ताणतणाव आणि त्या सगळ्यातून उभं राहण्याची ताकद दाखवण्यात आली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ? अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा खुलासा म्हणाली, आता वेळ….

१५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत. ट्रेलरमधून मिळालेल्या झलकांमुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, नात्यांचा वेगळा अर्थ सांगणारा ठरेल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर हा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

Web Title: Bapya movie trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.