(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बिग बॉस मराठीचा कालचा भाऊचा धक्का फारच जोरदार ठरला. होस्ट रितेशने घरात दादागिरी आणि माज दाखवणाऱ्या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. रितेश भाऊनं निक्कीला झापलं आणि जान्हवीला तुरुंगात जाण्याची शिक्षा दिली. यानंतर भाऊने घनश्यामलाही चांगलेच सुनावले. तसेच कालच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात खास पाहुणे देखील आले होते, त्यांनी सदस्यांना खेळ खेळण्यास सांगितले आणि त्यामुळे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन देखील झाले. तसेच यानंतर ‘बिग बॉसच्या घरात काल धक्कादायक घटना घडली. रितेश घनश्यामवर संतापलेला नजर आला हे पाहून घनश्यामदेखील बिथरलेला दिसून आला.
छोट्या पुढारीला रितेशने चांगलेच झापले
कालच्या भागात रितेश घनश्यामला म्हणाला, ‘या घरात एका सदस्याचा आवाज दबला जातोय, आणि तो म्हणजे घनश्याम दरवडे.” असं ती म्हणतो. या नंतर रितेशने त्याच्यासाठी एक खास टास्क डिझाईन केलेला होता ज्यामध्ये घनश्यामला नावाचे बॅज घरातील सदस्यांना लावायचे असतात. यामध्ये ‘माचिस’ ‘नागीन’ असे विशेषण असलेले चिन्हं असतात, मधील तो पॅडी, धनंजय आणि अंकिताची निवड करतो. या नंतर त्याला ‘चावी’ हे चिन्हं मिळते. जे बॅज लावायची वेळ येते तेव्हा घनश्याम म्हणतो की, “हे अवघड आहे”. हे ऐकून रितेश त्याच्यावर चांगलाच संतापतो. आणि घनश्यामला म्हणतो की, “बॅज लावताय की घर बाहेर येतायत, आज माझा मूड म्हणजे एकदम. एकाला जेलमध्ये टाकलाच आहे. गेल्या आठवड्यात डबल एविक्शन झाले होते, या आठवड्यातही मी ते करू शकतो.” असे तो घनश्यामला चिडून बोलतो.
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi 5 : “जिथं अत्याचार होणार तिथं सूरज नडणार…” गोलिगत सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरात नवी खेळी
रितेश घनश्यामवर आणखी भडकला
पुढे रितेश घनश्यामला म्हणाला, “एकतर तुम्ही घरात कुठे दिसत नाही. त्यात तुमच्यासाठी हा स्पेशल टास्क ठेवला. जो तुम्ही करायला नकार देताय. मी तुम्हाला एक संधी देतो. मी तुम्हाला नॉमिनेट करणार नाही परंतु मी या पुढे तुमच्याशी बोलणार नाही. तुमचा गेम, टास्क आता संपला. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. तुमची सगळी नाटकं आता बंद.” रितेशचे हे बोलणे ऐकताच घनश्यामच्या डोळ्यातून पाणी येते. जो हात जोडतो आणि म्हणतो की, “मला माफ करा सर. मला शिक्षा देऊ नका. बाहेर काढू नका. मी इथून पुढे असे काही करणार नाही.” असं तो म्हणतो यावर पुन्हा रितेश उत्तर देतो आणि म्हणतो की, “क्लोजअप काढा याचा.”