(फोटो सौजन्य-Instagram)
मराठी सिनेमासृष्टीत नावाजलेली आणि प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. या मराठी मनोरंजन क्षेत्रात प्राजक्ताच नाव ऐकताच एक प्रतिभावान आणि प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिमा डोळ्यासमोर येते. प्राजक्ताचा अभिनय आणि तिची कौशल्यशैली पाहून चाहते तिच्यावर फिदा आहेत. अभिनेत्री नृत्याच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला आली होती परंतु ती अभिनय क्षेत्रात वळली. आणि तिचा अभिनयाचे कर्तृत्व पाहून ती यशस्वी ठरली. प्राजक्ताने आता पर्येंतच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपट आणि मराठी मालिकेमध्ये काम केले आहे. आणि तिच्या या यशाला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले आहे.
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजु म्हणजेच प्राजक्ता माळी आज तिचा वाढदिवस साजरा करत असून, तिला अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांच्या शुभेच्छा मिळत आहे. प्राजक्ताला कधीच वाटले नव्हते की ती या क्षेत्रात येऊन आपले स्थान निर्माण करेल परंतु हे सगळं साध्य करून ती आज एक यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. एका अदभूत वळणाने ती नृत्याच्या जगातून अभिनयाच्या मार्गावर जाताना दिसली आहे. पुणेकर असलेली प्राजक्ता माळीला नृत्याची खूप आवडत आहे. ललित कला केंद्रात नृत्य विषयात एमए करत असताना योगायोगाने तिची भेट ‘तांदळा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांशी झाली. त्यांनी तिला या चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली. यानंतर प्राजक्ताने मागे वळून कधीच पहिले नाही. एकामागून एक संधी तिला या क्षेत्रात मिळत गेल्या आणि तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
हे देखील वाचा- हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया…प्राजक्ता माळीच्या गुलाबी रंगात चाहते न्हाले, म्हणतात ‘ब्युटीफूल छलिया’
घरची परिस्थिती बेताची असताना अभिनेत्रीने निवेदन आणि पैशासाठी काही भूमिका तिने केल्या होत्या. तससह प्राजक्ताला टीव्हीवर दिसायचे होते यासाठी ती कोणतेही काम करण्यासाठी तयार झाली होती. परंतु, तिला ‘जुळून येती रेशीम गाठी’ ही मालिका मिळाल्यानंतर प्राजक्ताला या क्षेत्राचे गांभीर्य समजले. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे तिने पूर्णपणे अभिनय क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांसोबतच ‘रानबाजार’सारख्या वेब सीरिजमध्ये तिची भूमिका प्रचंड गाजली आणि चाहत्यांनादेखील आवडली. तसेच सध्या अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो कार्यक्रमाचं निवेदन करताना प्रेक्षकांना दिसत आहे.
प्राजक्ताचा येणारा चित्रपट
प्राजक्ता आता मराठी चित्रपट ‘फुलवंती’ मध्ये देखील झळकताना दिसणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज निर्मित हा चित्रपट बनवण्यात आला असून, या चित्रपटाची मंगेश पवार ॲंड कंपनी आणि शिवोहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाचा चांगलाच अनुभव घेता येणार आहे. ११ ॲाक्टोबर २०२४ पासून तुमच्या मनावर राज्य करायला ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.