(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सध्या, हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत, त्यांच्याशिवाय चित्रपटातील पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांचा अभिनय आणि विनोदानेही लोकांना हसवले आहे. पण या सगळ्यामध्ये आणखी एक अभिनेता आहे, ज्याच्या अभिनयाकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. तो म्हणजे या चित्रपटामध्ये ‘जना’ हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी. ‘स्त्री 2’ मधील ‘जना’ या भूमिकेसाठी तो खूप प्रशंसा मिळवत आहे. आता अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या सेलिब्रिटी क्रशबद्दल खुलासा केला आहे. जे ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.
कियारा अडवाणी आहे अभिषेक बॅनर्जीची क्रश
अभिषेक बॅनर्जीने अलीकडेच अभिनेत्री कियारा अडवाणीवर क्रश असल्याचे उघड केले. त्याने सांगितले की वरुण धवनने त्याला ‘भेडिया’च्या सेटवर कियाराशी बोलायला सांगितले. ‘भेडिया’च्या सेटवरील एक मजेदार प्रसंग आठवताना अभिषेक बॅनर्जी म्हणाला- ‘शूटिंगच्या मध्यभागी वरुण धवनने मला माझ्या सेलिब्रिटी क्रशबद्दल विचारले आणि मी लगेच सांगितले की मला कियारा अडवाणी आवडते.’ त्यानंतर वरुणने त्याचवेळी कियाराला कॉल केला आणि कॉलवर सर्व काही तिच्यासोबत शेअर केले. कियाराने त्याला अचानक फोन केल्याने अभिषेक आश्चर्यचकित झाला होता.
स्त्री २ मध्ये फक्त जनाचीच हवा
तसेच, अभिषेक बॅनर्जीच्या ‘स्त्री 2’ मधील ‘जना’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली आहे. त्याने आपल्या कॉमिक टायमिंगने लोकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात ‘जना’ अशी व्यक्ती आहे जी डोळे मिटल्याबरोबर ‘स्त्री’ किंवा ‘सरकता’ची दहशत कोणावर आली आहे हे पाहू शकतो. तो बंद डोळ्यांनी अशा गोष्टी पाहतो ज्या इतर कोणी पाहू शकत नाही. स्त्री 2 व्यतिरिक्त अभिषेक बॅनर्जी वेदा या चित्रपटातही खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.
हे देखील वाचा- करण जोहरच्या चित्रपटातून अभिषेक बॅनर्जीला काढून टाकण्यात आले होते? अभिनेत्याने केला खुलासा!
कामाच्या आघाडीवर, अभिनेता अभिषेक बॅनर्जी आता स्त्री २ आणि वेदा या चित्रपटानंतर आणखी नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्याने चित्रपटाबरोबरच अनेक वेब सिरीज आणि मालिकेमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते वेडे झाले आहेत. म्हणूनच अभिनेत्याचा चाहता वर्गदेखील आता वाढत आहे.