(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘स्त्री 2’ चित्रपटामधील जनाची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी एका मुलाखतीमुळे आता वादाच्या चर्चेत अडकला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्याने करण जोहरच्या अग्निपथ चित्रपटाबद्दल सांगितले होते की, या चित्रपटाची कास्टिंग तो करत होता, पण नंतर त्याला काढून टाकण्यात आले. आता यावरून वाद वाढल्यानंतर अभिषेकने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की प्रत्यक्षात काय झाले? आणि काय घडले ते.
दृष्टी समजून घेण्यात चूक झाली
सोमवारी अभिषेकने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्याने आपले विचार सविस्तरपणे मांडले. निवेदनात म्हटले की, “2012 मधील अग्निपथ चित्रपटापासून वेगळे होण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शक करण मल्होत्राची दृष्टी आम्हाला समजू शकली नाही. अनमोल आणि मी त्यावेळी खूप लहान होतो, आम्ही 20-23 वर्षांचे असू आमचा अनुभव कोणत्याही मोठ्या व्यावसायिक चित्रपट काम करण्याचा नव्हता. त्यामुळे श्री. मल्होत्रा यांची दृष्टी समजून घेण्यात आम्ही अपयशी ठरलो होतो.” असं तो म्हणाला.
मी धर्मासोबत अखंड कार्यरत राहील
अभिषेक पुढे म्हणाला की, “आम्ही कधीही धर्मा प्रॉडक्शनवर काही चुकीचे केल्याचा आरोप केला नाही. सत्य हे आहे की मी धर्मा आणि करण जोहर यांचा खूप आदर करतो. मला हटवण्यामागे करण जोहरचा हात असल्याचे मी कधीच म्हटले नाही, परंतु तरीही काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे, हा निर्णय खरं तर श्री मल्होत्राच्या (अग्निपथचे दिग्दर्शक) टीमने घेतला होता आणि मी त्याच्याशी सहमत आहे.” असं अभिनेता या मुलाखतीत म्हणाला.
अभिषेक पुढे निवेदनात म्हणाला-
“नवोदित कलाकारांना आयुष्यात कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागल्यास कधीही हिंमत न हारण्याची प्रेरणा देण्यासाठी मी ही कथा शेअर केली, कारण नेहमीच पुनरागमन होते. आम्ही धर्मासोबत ओके जानू, स्टुडंट ऑफ द इयर 2, कलंक आणि अलीकडील रिलीज झालेल्या किल आणि ग्याराह ग्याराह यासह अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. मी धर्माच्या अजीब दास्तांसमध्येही अभिनय केला आहे.” अभिषेकने शेवटी सांगितले की, “धर्माने माझे आणि माझ्या कंपनीचे कास्टिंग बेचे नेहमीच भले केले आहे.
हे देखील वाचा- ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर झाला रिलीज, ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल!
स्त्री 2 व्यतिरिक्त, अभिषेक सध्या वेदा या चित्रपटामध्येही दिसत आहे, ज्यामध्ये त्याने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. अभिषेकने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असले तरी, त्याची सर्वात ओळखली जाणारी ओळख म्हणजे प्राइम व्हिडिओ मालिका पाताल लोक, ज्यामध्ये त्याने हथोडा त्यागीची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याने लोकांमध्ये प्रसिद्धी निर्मण केली.